काही पालकांसाठी मुलांकरता योग्य आणि हेल्दी आहार बनवणे थोडं कठीण काम असतं. शरीराच्या वाढीसाठी मुलांमध्ये पोषणतत्व असणे आवश्यक आहे. या स्थितीत टोफू अत्यंत महत्वाची भूमिका आहे. यामध्ये हाय क्वालिटीचे प्रोटिन आहे. ज्यामधून मुलांच्या शरीराकरता हेल्दी फॅट, कॅल्शियम, फोलिक ऍसिड आणि आर्यन मिळते.

यासोबत टोफू मॅग्नेशिअम, कॉपर, जिंक आणि विटामिन बी १ चांगल स्त्रोत आहे. एवढंच नव्हे तर बाळाकरता टोफू हे अतिशय हेल्दी फूड मानले जातात. मुलाकरता अनेक टोफूचे डिश बनवू शकतात. यामुळे जाणून घ्या टोफूचे आरोग्यदायी फायदे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

टोफूमधून मिळतं भरपूर प्रोटीन

टोफूच्या एका सर्व्हिंगमध्ये 8.1 ग्रॅम प्रथिने मिळतात. स्नायू उत्तम तयार करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. प्रथिने नवीन पेशी पुन्हा निर्माण करण्याचे काम करतात. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी प्रथिनेयुक्त अन्न शोधत असाल तर तुम्ही टोफू निवडू शकता. टोफूची पोषक तत्त्वे लहान मुलांसाठी अनेक पाककृतींद्वारे दिली जाऊ शकतात.

(वाचा – How to reduce cholesterol : या ५ सवयी रक्तात वाढू देत नाहीत घाणेरडं LDL कोलेस्ट्रॉल, उत्तम होईल ब्लड फ्लो)

​कॅल्शियमचा स्त्रोत

कॅल्शियमकरता मुलांना टोफू देऊ शकता. मुलांची हाडे मजबूत होण्यासाठी आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी टोफू हा उत्तम पर्याय असू शकतो. एका सर्विंग टोफूमध्ये 421 मिलीग्राम कॅल्शियम असते.

(वाचा – पावसाळ्यात योनिमार्गातील यीस्टचा संसर्ग कसा टाळावा? जाणून घ्या हे 7 महत्त्वाचे उपाय))

​आर्यनचे स्त्रोत

जर तुम्हाला तुमच्या मुलाला लोहाच्या कमतरतेच्या अशक्तपणापासून वाचवायचे असेल किंवा त्याला पुरेशा प्रमाणात आर्यन द्यायचे असेल तर त्याच्या आहारात टोफूचा समावेश करा. टोफूच्या एका सर्व्हिंगमध्ये 3.35 मिलीग्राम आर्यन मिळते. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यात लोह महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे मेंदूचे कार्य योग्यरित्या होते आणि हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते.

(वाचा – पावसाळ्यात योनिमार्गातील यीस्टचा संसर्ग कसा टाळावा? जाणून घ्या हे 7 महत्त्वाचे उपाय))

​पोटॅशियम मिळते

लहान मुलांना टोफू खायला दिल्याने स्नायू मजबूत होतात. या कामासाठी पोटॅशियम खूप महत्त्वाचे मानले जाते. टोफूच्या एका सर्व्हिंगमध्ये 178 मिलीग्राम पोटॅशियम असते. पोटॅशियम रक्तदाब कमी करते. खनिज घनता वाढवते आणि स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते. टोफूच्या मदतीने मुलाला पोटॅशियम मिळू शकते.

(वाचा – Health Tips : चाळीशीनंतर महिलांच्या हाडांची दुखणी वाढतात; मग या ५ पदार्थांनी शरीराला मिळतील भरपूर कॅल्शिअम))

​मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असते

टोफूमध्ये असलेल्या पोषकतत्वात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. हे पोषक तत्व हे शरीरात एंजाइम्सचे कार्य करते आणि त्यासाठी प्रोत्साहन देते. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम घेतल्याने कार्डियोवस्कुलर सिस्टमला प्रोत्साहन मिळते. आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

(वाचा – मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्सची लक्षणे एकसमान; ‘या’ एक्सपर्ट टिप्समधून समजून घ्या यातील फरक)

​एनर्जी मिळते

टोफूमध्ये प्रोटीन असते जे मुलांना ऊर्जा देण्याचे काम करते. टोफूमध्ये असलेले पोषक तत्व शरीराच्या कार्याला चालना देण्यास मदत करतात. तुमचे मूल सुस्त आणि नेहमी ऍक्टिव्ह राहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्या जेवणात टोफूचा नक्कीच समावेश करा.

(वाचा – आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी प्यायला पाहिजे की नाही? आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत काय? जाणून घ्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published.