नवी दिल्लीःPoco F4 5G स्मार्टफोनला लवकरच भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहे. परंतु, लाँचिंग आधीच या फोनची फीचर्स कंपनीकडून कन्फर्म करण्यात आली होती. आता एका रिपोर्टने फोनची किंमत लीक समोर आली आहे. फोनची किंमत ऑथराइज्ड शाओमी रिटेलरकडून लीक करण्यात आली आहे. लीक वरून फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत उघड झाली आहे.

Poco F4 5G Price (लीक)
रुट माय गॅलेक्सीच्या रिपोर्टवरून उघड झाले की, पोको एफ ४ ५जीच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत 459 डॉलर (जवळपास ३५ हजार ९०० रुपये) आहे. कंपनीने आधीच हे स्पष्ट केले आहे की, फोन १२ जीबी व्हेरियंट मध्ये असणार आहे. १२ जीबीच्या मॉडलची किंमत थोडी जास्त असू शकते. भारतात या पोको मोबाइल फोनची किंमत थोडी कमी असू शकते. भारतात या फोनला २७ हजार रुपयाच्या किंमतीत उतरवले जावू शकते. या फोनवर बँक ऑफर्स मिळाल्यानंतर हा फोन आणखी स्वस्त किंमतीत मिळू शकतो. या फोनला २३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट दिले जाणार असून हे सर्वात स्वस्त फोन बनू शकतो.

वाचा: eSIM Transfer: भन्नाटच ! आता ब्लूटूथने ट्रान्सफर करता येणार eSIM, फॉलो करावी लागेल ही सोप्पी प्रोसेस

Poco F4 5G Specifications (लीक)
आतापर्यंत समोर आलेल्या लिक्सनुसार, फोनमध्ये ६.६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. या फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेशन रेट सपोर्ट सोबत येवू शकतो. कॅमेरा सेटअप मध्ये फोनच्या बॅक पॅनेलवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा लेन्स दिला जावू शकतो. सेल्फी साठी फोनच्या फ्रंट मध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.

वाचा: Upcoming phones: नवीन फोन खरेदी करायचा असेल तर थोडी वाट पाहा, भन्नाट फीचर्ससह जूनमध्ये लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स

वाचा: Godrej Fridge: डबल डोर फ्रिजवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, १५ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.