मुंबई : भांडवली बाजारातील चौफेर विक्रीत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअरची मोठी वाताहत झाली. आज एलआयसीचा शअर ५ टक्क्यांपर्यंत कोसळला आणि ६७० रुपयांचा नवा नीचांकी स्तर गाठला. आयपीओतील शेअरच्या तुलनेत एलआयसी आता २८ टक्के घसरला आहे. ही घसरण अशीच सुरु राहिली तर लाखाचे १२ हजार होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

आज सोमवारी १३ जून २०२२ रोजी मुंबई शेअर बाजारात ‘एलआयसी’चा शेअर ४.५० टक्क्यांनी घसरला. तो सध्या ७७०.८५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. इन्ट्रा डे मध्ये त्याने ७७०.१० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. गेल्या आठवड्यात त्यात प्रचंड घसरण झाली होती.

खूशखबर; कमॉडिटी बाजारात झाली मोठी घसरण, सोनं आणि चांदी झालं स्वस्त
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) मंचावर सध्या ‘एलआयसी’चा शेअर ७७०.३५ रुपये असून त्यात ५.५४ टक्के घसरण झाली आहे. शेअरमधील घसरणीने ‘एलआयसी’च्या बाजार मूल्यात देखील मोठी घट झाली आहे. ‘एलआयसी’चे बाजार मूल्य ४.३४ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे.

कर्जदारांना आणखी एक धक्का; दोन सरकारी बँंकांनी व्याजदर वाढवला, कर्ज महागणार
एलआयसीच्या आजच्या पडझडीमागे अॅंकर गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याचे बोललो जाते. आज अँकर गुंतवणूकदारांचा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा ३० दिवसांचा लॉक इन कालावधी संपुष्टात आला. या गुंतवणूकदारांनी लॉस बुक करुन बाहेर पडणे पसंत केले असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. त्यामुळे एलआयसीमध्ये आज ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला, तासाभरात सहा लाख कोटींचा चुराडा
दरम्यान, नुकताच केंद्र सरकारने एलआयसीच्या शेअरमधील घसरणीबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘एलआयसी’ शेअरमधील घसरण ही तात्पुरती आहे, असे केंद्रीय सचिव तुहिन कांता पांडे यांनी म्हटले होते. समभागधारकांचे मूल्य वाढावे, यासाठी ‘एलआयसी’ व्यवस्थापन लक्ष घालेल, असे पांडे यांनी म्हटलं होते.

महिनाभरात दीड लाख कोटी बुडाले
‘एलआयसी’च्या आयपीओमध्ये मोठ्या आशेनं गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला आहे. या शेअरने आतापर्यंत २८ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली. ‘एलआयसी’चा शेअर १७ मे २०२२ रोजी ८७२ रुपयांचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. ‘एलआयसी’ आयपीओसाठी ९४९ रुपये प्रती शेअर किंमत निश्चित करण्यात आली होती. आता शेअर ६७० रुपयांपर्यंत खाली आला आहे. महिनाभरात गुंतवणूकदारांचे जवळपास दीड लाख कोटींचे नुकसान झाले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.