नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट Flipkart वर लवकरच End Of Season Sale सुरू होणार आहे. तुम्ही जर टीव्ही अथवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलचा फायदा घेऊ शकता. ११ जूनपासून सुरू होणारा फ्लिपकार्ट सेल १७ जूनपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला लेटेस्ट लाँच, बंपर डिस्काउंट आणि इतर ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये टीव्ही, किचन अॅप्लायन्स, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर वस्तूंवर डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart End Of Season Sale मध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: AirtelDown होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, कोण काय म्हणालं पाहा

स्वस्तात खरेदी करा टीव्ही आणि फ्रिज

कंपनीने Flipkart End Of Season Sale ला मायक्रो साइटवर लाइव्ह केले आहे. फ्लिपकार्ट मायक्रो साइटनुसार, सेलमध्ये ७,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत शानदार टीव्ही उपलब्ध आहे. तर एअर कंडिशनरला ५५ टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. रेफ्रिजरेटवर देखील ५५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. प्यूरीफायरवर ७० टक्के आणि ब्रेकफास्ट अॅप्लायन्सवर ७५ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये वॉशिंग मशीनला ६० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तर इतर होम अॅप्लायन्सेजवर ७० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. या सेलमध्ये ४के टीव्हीला तुम्ही २३,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, बेस्ट सेलिंग इन्वर्टर एसी २०,४९० रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. फ्रंट लोड वॉशिंग मशीन फक्त १७,९९० रुपयात तुमची होईल.

वाचा: Upcoming Smartphone: कन्फर्म! ‘या’ तारखेला येतोय Nothing चा पहिला वहिला ट्रान्सपेरेंट फोन, आयफोनला देणार टक्कर

टीव्हीवर मिळेल भन्नाट ऑफर

Flipkart End Of Season Sale मध्ये Croma चा २४ इंच टीव्ही फक्त ७,४९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ३२ इंच स्क्रीनसह येणाऱ्या MarQ TV ला तुम्ही ८,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये OnePlus Y1 TV १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही सॅमसंगच्या ३२ इंच स्क्रीनसह येणाऱ्या HD Ready Smart TV ला १५,९९९ रुपये खर्चून खरेदी करू शकता. तसेच, LG HD Ready LED Smart TV च्या ३२ इंच मॉडेलसाठी तुम्हाला १६,९९९ रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, ११ जूनपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या या शानदार सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टीव्हीसह अनेक वस्तूंना बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल. हा सेल १७ जूनपर्यंत चालेल.

वाचा: Smartphone Offers: भन्नाट ऑफर! ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा सॅमसंगचा बेस्टसेलर फोन मिळतोय फक्त १० हजारात, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.