शामली: आईला जिवंत पेटवणाऱ्या बापाला दोन मुलींनी जन्माची अद्दल घडवली आहे. आपल्या पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला बुलंदशहर न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली. तान्या आणि लतिका यांच्यासमोरच त्यांच्या वडिलांनी आईला जिवंत पेटवलं. वंशाला दिवा न दिल्यानं वडिलांनी तान्या आणि लतिका यांच्या आईला संपवलं. जून २०१६ मध्ये ही घटना घडली. दोघींनी आपल्या आईला जिवंत जळताना पाहिलं. आईला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही मुलींनी कायदेशीर लढा दिला आणि त्या वडिलांविरोधात न्यायालयात गेल्या. अखेर न्यायालयानं त्यांच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

४८ वर्षांच्या मनोज बन्सल यांनी ६ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीला जिवंत जाळलं. त्यावेळी त्यांनी तान्या आणि लतिकाला एका खोलीत कोंडलं. मात्र दोघींनी एका खिडकीतून संपूर्ण प्रकार पाहिला. त्यावेळी लतिका १४ तर तान्या १२ वर्षांची होती. न्यायालयानं दिलेला निकाल महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया मुलींचे वकील असलेल्या संजय शर्मांनी दिली.
संदीप कोरगावकरची आत्महत्या; पोलिसांनी चक्रं फिरवली अन् तब्बल ३०० कोटींचा घोटाळा उघड
या प्रकरणात आणखी सात आरोपी आहेत. सगळे एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्या विरोधातला खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर ऑगस्टमध्ये सुनावणी होईल, अशी माहिती शर्मांनी दिली. बेरोजगार असलेले वडील अतिशय क्रूरपणे वागायचे. त्यांचं क्रौर्य आम्ही कित्येकदा पाहिलं, अशा शब्दांत दोन बहिणींनी त्यांच्या कटू आठवणी सांगितल्या.

मनोज बन्सल यांचा विवाह २००० साली अनू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली झाल्या. मात्र मनोज यांना वंशाचा दिवा होता. त्यासाठी त्यांनी पाचवेळा अनू यांना गर्भपात करायला लावला. १४ जून २०२६ रोजी मनोज यांनी अनू यांना केरोसिन टाकून पेटवलं. ही घटना तान्या आणि लतिका यांनी पाहिली. लतिकानं मदतीसाठी तिच्या आजीला (आईच्या आईला) बोलावलं. अनू यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं. मात्र २० जूनला त्यांचं निधन झालं.
धक्कादायक! ओव्हरटेकिंगवरून वाद; कावड यात्रेकरूंची जवानाला बेदम मारहाण; अर्ध्या तासात मृत्यू
या प्रकरणी अनू यांच्या आई ओमवती यांनी एफआयआर नोंदवला. मनोज आणि अन्य सात जणांवर त्यांनी आरोप केले. आपल्या आईला न्याय मिळावा यासाठी तान्या आणि लतिका यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना रक्तानं पत्र लिहिलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं. पोलिसांनी सुरुवातीला हत्येचं कलम लावलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी ते बदललं आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं कलम लावलं. त्याला तान्या आणि लतिका यांच्या वकिलांनी न्यायालयात आव्हान दिलं. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.