नवी दिल्ली :Airtel Yearly prepaid Plan: खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि Vi ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स आणत आहेत. कंपन्यांकडे अगदी १५ दिवसांपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स आहेत. ग्राहक खासकरून वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला पसंती देत आहे. या प्लान्समुळे यूजर्सला वर्षातून केवळ एकदाच रिचार्ज करावे लागते. देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel कडे वर्षभराच्या वैधतेसह येणारा शानदार प्रीपेड रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत १,७९९ रुपये आहे. Airtel च्या १,७९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स जाणून घेऊया.

वाचा : Android यूजर्स सावधान! Google Play Store वरून हटवले ‘हे’ १३ धोकादायक अ‍ॅप्स, तुमच्या फोनमधून त्वरित करा डिलीट

Airtel कडे आहे १,७९९ रुपयांचा प्लान

Airtel च्या १,७९९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात वर्षभरासाठी तुम्हाला एकूण २४ जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, संपूर्ण वर्षभर देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा देखील मिळेल. यात संपूर्ण कालावधीसाठी एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. प्लान अतिरिक्त बेनिफिट्ससह येतो. यात ३ महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle चा अ‍ॅक्सेस, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून, , Wynk Music चा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळतो. तुम्हाला जर जास्त डेटाची गरज असल्यास कंपनीकडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे इतर प्लान्स देखील उपलब्ध आहेत.

वाचा: तुमची पार्टी दणाणून सोडतील ‘हे’ शानदार स्पीकर, किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी, पाहा लिस्ट

प्लानचा दिवसाचा खर्च फक्त ५ रुपये

१,७९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लानचा दिवसाचा खर्च फक्त ४.९२ रुपये आहे. म्हणजेच, तुम्ही दिवसाला जवळपास फक्त ५ रुपये खर्चून डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. दरम्यान, इतर टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाकडे देखील वर्षभराच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत.

वाचा : पुन्हा अशी संधी नाही! आकर्षक ऑफर्ससह मिळतोय Samsung चा दमदार ५जी स्मार्टफोन, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.