नवी दिल्ली: जिममध्ये तासंतास व्यायाम करुन, घाम गाळून बॉडी बनवणे आजकाल फॅशन झालं आहे. तर चांगली पिळदार बॉडी मिळवायसाठी अनेकजण वेगवेगळी औषधं, स्टेरॉईड्स आणि इंजेक्शन्सचा वापर करतात. पण, याचे अनेक दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. असंच एक धक्कादायक प्रकरण ब्राझीलमध्ये पुढे आलं आहे. ब्राझीलचा एक बॉडीबिल्डर आणि टिकटॉक स्टार वाल्दिर सेगातो याचा बॉडी बनवायच्या चक्करमध्ये मृत्यू झाला आहे. दुख:द म्हणजे त्यांच्या ५५ व्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला.

वाल्दिर सेगातो ‘हल्क’ या नावाने ओळखला जायचा. या व्यक्तीने २३ इंचाचे बायसेप्स बनवायसाठी स्वत:ला एक अत्यंत घातक अशा तेलाचं इंजेक्शन लावलं. त्यामुळे रिबेराओ प्रेटो येथे त्यांच्या ५५ व्या वाढदिवशीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा-जवाहिरीनंतर अल कायदाचा म्होरक्या म्हणून ‘या’ कुख्यात दहशतवाद्याचे नाव चर्चेत; विध्वंसक कारवायात सहभाग

स्ट्रोक आणि इंफेक्शनचा धोका असतानाही बायसेप्स आणि बॅक मसल्स वाढवण्यासाठी वाल्दिर सेगातो खूप दिवसांपासून सिंथॉल इंजेक्शनचा वापर करत असल्याची माहिती आहे. वाल्दिरने २०१६ मध्ये सांगितलं होतं की त्याला लोक हल्क आणि हि-मॅन म्हणतात. ते ऐकायला त्याला आवडतं.

वाल्दिरला डॉक्टरांनी सहा वर्षांपूर्वीच याबाबत सतर्क केलं होतं. बॉडी बनवण्यासाठी इंजेक्शन घेतलं तर नर्व्स डॅमेजसह अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तरीही वाल्दिर मसल्स वाढवण्यासाठी सातत्याने इंजेक्शनचा वापर करत होता. २३ इंचाचे मसल्स करण्यासाठी तो हे जीवघेणे इंजेक्शन घेत होता. त्याचे मसल्स पाहून लोक त्याला ‘द मॉन्स्टर’ म्हणायचे.

हेही वाचा-सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध; खोदकाम सुरू असताना सापडले प्राचीन मंदिर

वाल्दिर सेगातो हा टिकटॉक स्टार होता. तो सोशल मीडियावर त्याच्या बॉडीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे. टिकटॉकवर त्याचे १.७ मिलीयन फॉलोअर्स आहेत. त्याच्या ५५ व्या वाढदिवशी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्याने आईला बोलावलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा-जवाहिरीचा खात्मा करणारे अमेरिकेचे ‘निंजा मिसाइल’; किती घातक आहे ‘हे’ हत्यार

आनंदाश्रमकडे पाहिलं अन् टचकन डोळ्यात पाणी आलं…. शिष्याचं आनंद दिघेंना पत्र

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.