मुंबई : कोणताही सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला तर त्यातून सिनेमाच्या टीमला मिळणारा आनंद मोठा असतो. सिनेमाचा विषय सामाजिक असेल तर त्यातून मोठ्या संख्येने लोकांपर्यंत त्यातील संदेश पोहोचतो. असाच काहीसा प्रतिसाद अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ या हायपरलिंक सिनेमाला मिळतो आहे. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या ‘वाय’ने अनेक स्त्रियांना या संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिला प्रेक्षकांनी आपले अनुभव ‘वाय’च्या टीमसोबत शेअर केले.

सिद्धार्थ जाधव लंडनमध्ये बोलला शिवडीच्या इंग्लिशमध्ये, Video एकदा पाहाच!

महाराष्ट्रात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा सिनेमा राज्याबाहेरही गेला. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. त्यानंतर हरियाणात चंदीगढ इथे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत सिनेमा दाखवला गेला. त्यासंबंधी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पोस्ट शेअर केली आहे. सिनेमाच्या टीमनं हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं आणि सन्मान केला.

प्राजक्तानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘हा सिनेमा महाराष्ट्राबाहेर पोहोचतोय, यातच आनंद आहे.’ राज्यातही अनेक ठिकाणी सिनेमातल्या कलाकारांचा गौरव झाला. कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या चित्रपटामुळे प्रेरित होत एक अनोखा सोहळा केला. आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी मुलीचं बारसं केलं. त्यांनी ‘वाय’चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. या शोदरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधी केला.

‘योगयोगेश्वर जय शंकर’मध्ये सृष्टीचं आगमन, रक्षाबंधनाला करणार मोठं काम

विशेष म्हणजे देशमाने जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘मुक्ता’ ठेवले आहे. या जोडप्याने बारशाच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला. अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी बारशाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सिनेमा लिहिणं लग्न लावण्यासारखं असतं असं प्रियदर्शन जाधव का म्हणतोSource link

Leave a Reply

Your email address will not be published.