मुंबई : भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आपल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक आनंदाची बातमी दिली आहे. जखमी डी कॉक तंदुरुस्त झाल्याची बातमी समोर येत असून वृत्तांनुसार दक्षिण आफ्रिकेचा धुरंधर सलामीवीर चौथ्या सामन्यासाठी मैदानात उतरू शकतो.

मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी डी कॉकला मनगटाची दुखापत झाली होती. यामुळे तो दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकला नाही. तर पहिल्या सामन्यात डी कॉकने २२ धावांची खेळी केली होती. त्यामुळे डी कॉक चौथा सामना खेळला तर सध्या मालिका विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढेल, कारण डी कॉक आयपीएलपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. २९ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने लखनौ सुपर जायंट्सकडून १५ सामन्यांत १४८.९७ च्या स्ट्राइक-रेटने ५०८ धावा केल्या.

वाचा – मलिकशी तुलनेवर आफ्रिकेच्या स्पीड-स्टारचे धक्कादायक विधान, म्हणाला – ‘मला, पर्वा नाही’

शेवटच्या क्षणी होणार निर्णय
अलीकडेच, दक्षिण आफ्रिका व्यवस्थापनाने डी कॉकच्या दुखापतीबाबत अपडेट दिले. त्यांनी म्हटले की, “क्विंटन डी कॉकच्या मनगटाच्या दुखापतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. चौथ्या सामन्यासाठी डी कॉकच्या उपलब्धतेबाबत निर्णय शेवटच्या क्षणीच घेतला जाऊ शकतो.” डी कॉकच्या जागी हेनरिक क्लासेनला गेल्या दोन सामन्यात संधी देण्यात आली. क्लासेन आफ्रिकी संघाच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाचा नायक ठरला होता. तर तिसऱ्या सामन्यात बॅटने योगदान देण्यात अपयशी ठरला.

वाचा – शाहरुख खानच्या स्टाइलमध्ये घेतली दिनेश कार्तिकने भन्नाट एंट्री, व्हिडिओ झाला व्हायरल

दक्षिण आफ्रिका २-१ ने आघाडीवर
दक्षिण आफ्रिका सध्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पाहुण्या संघाने दिल्ली आणि कटक येथे झालेल्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्याचवेळी विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत विजयाची नोंद केली. आता दोन्ही संघांमधील चौथा सामना आज (१७ जून) राजकोटमध्ये होणार आहे.

वाचा – IND vs SA: भारताला चालून आली मालिका विजयाची संधी; आफ्रिकेचा हुकुमी एक्का ‘बाहेर’

एडन मार्करमची एक्झिट
भारताविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला एक धक्का बसला. धडाकेबाज फलंदाज एडन मार्करम उर्वरित दोन सामन्यातून आता बाहेर पडला आहे. दिल्ली येथे पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी मार्करमची कोविड-१९ चाचणी सकारात्मक आढळली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.