मुंबई: तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत, तसेच सिनेमातील त्यांची केमिस्ट्रीही दोघांना आवडली होती. या जोडीने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ हे सुपरहिट चित्रपट एकत्र केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला दोघांनी एकत्र हिट चित्रपट दिल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत. दरम्यान एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की दोघेही आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. त्यांचे ब्रेकअप 2 वर्षांपूर्वीच झाले असल्याचे बोलले जात आहे.


हे वाचा-ही दोस्ती तुटायची नाय! या मराठमोळ्या अभिनेत्रींचे रील्स ठरतायंत सुपरहिट

रश्मिका आणि विजय दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात. दोघांचे अनेक व्हिडिओ (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna Video) आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय सिनेमांच्या प्रमोशनव्यतिरिक्तही दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे हे क्यूट ऑनस्क्रिन कपल खऱ्या आयुष्यातही कपल असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ हे चित्रपट करताना दोघांमधील जवळीक वाढल्याचे बोलले जाते. मात्र ईटाइम्सच्या एका एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की दोन वर्षांपूर्वीच या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. मात्र त्यामागचे कारण समोर आलेले नाही.

हे वाचा-मराठीमध्येही सिक्वेल-प्रिक्वेल! हाच फंडा वापरत साऊथ सिनेमांनी केलीये बक्कळ कमाई

अजूनही होतात रिलेशनशिपच्या चर्चा
काही दिवसांपूर्वी दुलकर सलमान, मृणाल ठाकुर आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘सीता रामम’ सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये विजय सहभागी झाला होता. त्यावेळी विजय तिला जाहीरपणे असे म्हटले होते की, ‘रश्मिका तू नेहमीच सुंदर दिसतेस. का माहित का पण मी तुझं नाव घेतलं की सगळे हसू लागतात?’ विजयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या होता.


काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेसह कॉफी विथ करणमध्ये आलेल्या विजयने म्हटले होते की तो आणि रश्मिका केवळ चांगले मित्र आहेत. मात्र रश्मिकाचं नाव न घेता तिच्या आणि विजयच्या नात्याबाबत अनन्याने भाष्य केलं होतं. विजयसह रिलेशनशिपच्या चर्चा होण्याआधी रश्मिकाचा साखरपुडा दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीसह झाला होता, त्यांनंतर त्यांचा साखरपुडा मोडला होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विजय ‘लायगर’मधून अनन्या पांडेसह बॉलिवूड पदार्पण करत आहे. तर रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुडबाय’ सिनेमात तर सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजनू’सह दिसणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.