रतलाम: मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आली. कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ चित्रित केला. तो आज सोशल मीडियावर व्हायरल झाला.

विद्यार्थ्यांनी लपूनछपून काढलेल्या व्हिडीओमध्ये आठपेक्षा अधिक ज्युनियर विद्यार्थी दिसत आहेत. मान खाली घालून ते रांगेत उभे आहेत. सिनियर विद्यार्थी एकापाठोपाठ एक येऊन या विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. या घटनेची दखल घेण्यात आल्याचं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र कुमार गुप्ता यांनी सांगितलं. अँटी रॅगिंग समितीला या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
पुढील बर्थडेच्या शुभेच्छा! केकमध्ये सल्फर मिसळलं, पत्नी, मुलीसह इंजिनीयरची आत्महत्या
महाविद्यालयात रॅगिंग सुरू असल्याचं गुरुवारी रात्री आम्हाला समजलं. काल आम्हाला घडलेल्या घटनेची माहिती संपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर अँटी रॅगिंग समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली, असं गुप्ता म्हणाले. रॅगिंग करणारे विद्यार्थी २०२० च्या बॅचचे आहेत. त्यांच्याकडून २०२१ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात येत आहे. रॅगिंग करणाऱ्या १० विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
विमानानं पेट घेतला, मृत्यू समोर दिसू लागला; शेवटच्या क्षणी पायलटनी ३ हजार जणांचा जीव वाचवला
याआधी इंदोरमधील महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रॅगिंगबद्दल निनावी तक्रार दाखल केली होती. महाविद्यालयात खूप मोठ्या प्रमाणात रॅगिंग होत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालय हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठं वैद्यकीय महाविद्यालय आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.