अमरावती: अमरावती न्यायालयाने अमरावतीचे आमदार रवी राणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. अमरावती पोलीस हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी आले होते. मात्र, रवी राणांच्या घरी कोणीही नसल्याने हे वॉरंट स्विकार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे रवी राणांना विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वॉरंट बजावण्यात आल्याने भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

अमरावती पोलिसांनी खार यांनी पोलिसांची मदत घेतली आणि ते हे वॉरंट घेऊन रवी राणांच्या घरी गेले. पण, तेव्हा रवी राणा किंवा खासदार नवनीत राणा हे घरी नव्हते. त्यामुळे पोलीस वॉरंट न देताच परतले. रवी राणा यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तारखेला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट काढल्याची माहिती आहे.

हेही वाचा –FB लाईव्ह सुरू असतानाच रवी राणांना आठवेना हनुमान चालीसा, पुढे काय केलं तुम्हीच पाहा VIDEO

कुठल्या प्रकरणी वॉरंट?

फेब्रुवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला होता. अमरावती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मात्र घटनेच्या वेळी आपण दिल्लीतच असल्याचे राणांनी सांगितले.

हेही वाचा –‘तुम्ही म्हणाल तोच नियम काय?’ रवी राणांच्या मतदानावर आक्षेप, नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या

फेसबुक लाइव्ह सुरु असताना रवी राणांची फजिती; आठवेना हनुमान चालीसा, पोस्ट डिलीट करण्याची नामुष्कीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.