मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Anniversary) याने दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबीयांसह सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज सुशांतच्या आठवणीत त्याचे चाहते, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांनी स्पेशल पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान अशीच एक खास पोस्ट अभिनेत्री सारा अली खान हिने देखील केली आहे.

हे वाचा-‘ड्रेसिंग सेन्सच नाही…’, आमिर खान अजब कपड्यांमुळे ट्रोल; मुलासोबतचा हा Video Viral

अभिनेत्री सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले. या सिनेमामध्ये तिच्यासह मुख्य भूमिकेत सुशांतसिंह राजपूत होता. बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्यावर साराचा पहिला हिरो सुशांत होता, त्यामुळे सुशांत नक्कीच तिच्यासाठी खास आहे. याशिवाय ‘केदारनाथ’ (Sara Ali Khan Sushant Singh Rajput Kedarnath) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सारा आणि सुशांत यांच्या डेटिंगच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर सारा कार्तिकला डेट करत असल्याचे समोर आल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता सारा अली खान हिने सुशांतसाठी खास पोस्ट केली आहे.

हे वाचा-२२ लाखांची बाइक ते १.५ कोटींची कार, सुशांतसिंह राजपूतला होतं लग्झरी गाड्यांचं वेड

साराने यावेळी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यानचा असावा कारण यात सुशांत त्याच्या ‘केदारनाथ’मधील मन्सूरच्या गेटअपमध्ये आहे. साराने असं म्हटलं आहे की, ‘पहिल्यांदा कॅमेरा फेस करण्यापासून ते तुझ्या टेलिस्कोपमधून ज्युपिटर आणि चंद्र पाहण्यापर्यंत- कितीतरी गोष्टी तुझ्यामुळे पहिल्यांदा घडल्या. मला ते क्षण आणि आठवणी देण्यासाठी धन्यवाद. आज पौर्णिमेच्या रात्री मी जेव्हा आकाशात बघेन तेव्हा मला माहित आहे तु तिथे वर तुझ्या आवडीच्या ताऱ्यांसह आणि नक्षत्रांसह असशील. आता आणि नेहमीच चमकत राहा. #JaiBholenath ‘. अभिनेत्री सारा अली खानची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते देखील त्याची आठवण काढत यावर कमेंट करत आहेत.


अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव समोर आली होती. त्यापैकी एक नाव सारा अली खान हे देखील होतं. सारा अली खान हिची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.