वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वीजजोडणी देणाऱ्या कंपनीकडून तुम्ही नाडले जात असाल तर, याकंपनीपासून सुटका करून घेत नवी वीज कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य आता तुम्हाला मिळू शकणार आहे. वीज कंपन्यांची मक्तेदारी मोडून ग्राहकांना एकापेक्षा अधिक वीज कंपन्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची तरतूद असणारे वीज (सुधारणा) विधेयक २०२२ संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशन येत्या जुलैमध्ये होणार आहे.

सोने-चांदी, एफडी, बिटकॉईन आणि शेअर; एका वर्षात कोणी दिला धमाकेदार परतावा
भारतीय व्यापार आणि वाणिज्य महासंघाच्या वतीने (फिक्की) गुरुवारी आयोजित ‘इंडिया एनर्जी ट्रान्समिशन समिट २०२२’मध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी ही माहिती दिली. ‘नव्या वीज कायद्यासाठी आम्ही सर्व जण (संबंधित मंत्रालये, संबंधित घटक) सज्ज आहोत. पावसाळी अधिवेशनात आम्ही ते मांडू शकू,’ असेही सिंह म्हणाले. देशात ग्रीन हायड्रोजनचा वापर, सर्व वाहने विजेवर आणि सर्व उद्योग पर्यावरणपूरक ऊर्जेवर चालविण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यास २०३०पर्यंत देशात ७०० गिगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे असे सांगून त्यासाठी प्रोत्साहनपर लाभांश देण्याचे संकेतही त्यांनी दिले.

सोनं-चांदीवर दवाब ; जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं
वीज उत्पादन क्षेत्राचे सध्याचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत, असे ऊर्जा विभागाचे सचिव आलोककुमार यांनी सांगितले.

नव्या वीज कायद्यातील संभाव्य तरतुदी

– वीज वितरणात सरकारी कंपन्यांच्या जोडीनेच इतरांनाही परवानगी देणे

– प्रत्येक आयोगात एका कायदेतज्ज्ञाची नेमणूक करणे

– वीज अपीलीय न्यायाधिकरणे (अॅप्टेल) अधिक सक्षम करणे

– ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य निश्चित करणे

मल्टीबॅगर; ‘या’ स्टॉकमधील १ लाख रुपयांची गुंतवणूक वर्षभरात ५ लाखाची झाली
अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनकारक
नव्या विधेयकात कंपन्यांना अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनांतर्गत (आरपीओ) पवनऊर्जा खरेदी करणे बंधनकारक करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळू शकेल. वीज वितरण कंपन्या (सरकारी), मुक्त परवानाधारक ग्राहक आणि घाऊक ग्राहक यांना ठरावीक प्रमाणात पवनऊर्जा खरेदी करावी लागेल. ती थेट पवनऊर्जा प्रकल्पांकडून खरेदी करण्याचीही मुभा असेल.

– सध्या देशातील अपारंपरिक विजेची उपलब्धता ः २०५ गिगावॉट

– सन २०३०पर्यंत अपारंपरिक ऊर्जेच्या उत्पादनाचे आधीचे उद्दिष्ट ः ५०० गिगावॉट

– अपारंपरिक ऊर्जेचा पूर्ण वापर झाल्यास २०३०पर्यंतचे संभाव्य उद्दिष्ट ः ७०० गिगावॉट
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.