मुंबई: अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट, विजय वर्मा, शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यूज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘डार्लिंग्ज’ सिनेमात संतोष जुवेकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. एक मराठमोळा चेहरा या सिनेमात दिसत असल्याने संतोष जुवेकरचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे.

०५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ‘डार्लिंग्ज’ प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटची आहे, तर आलिया भट्टची इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स कंपनीने या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे. शाहरुखचा सिनेमा असल्याने ‘डार्लिंग्ज’ संतोषसाठी का खास आहे, हे सांगणारी एक पोस्ट संतोषनं त्याच्या सोशल मीडियावर केली आहे. त्याने डार्लिंग्जचा ट्रेलर या पोस्टमध्ये शेअर केला आहे.

हे वाचा-कोण विचारतंय सारखं स्पृहा जोशीला जेवलीस का? हा Video चुकवू नका

काय म्हणाला संतोष जुवेकर?

अभिनेता संतोष जुवेकर याने डार्लिंग्जचा ट्रेलर शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्याने शाहरुखच्या कंपनीत काम करण्याबाबतचा त्याचा एक जुना आणि एक नवा अनुभव सांगितलाय. संतोष म्हणतो की- ‘वर्ष -१९९८. ठिकाण – दीप भवन, ड्रीम्स अनलिमिटेड प्रोडक्शन (शाहरुख खान आणि जुही चावला यांचे प्रोडक्शन ऑफिस). मी ऑफिसबाहेर उभा राहून आत जाता येईल का, कुणाला भेटता येईल का म्हणुन गेटवर जाऊन एका सिक्योरिटी गार्डला विचारतो तर तो मला ओरडून सांगतो की, ‘चलो निकलो इधरसे चलो. उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही आनेका. चलो निकलो’ मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो की, ‘रुक तू एक दिन तुमलोगही गेट खोलेगा मेरे लिये’. असं बोलून त्या बिल्डिंगजवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो. पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला.’

अभिनेत्याने पुढे लिहिलं आहे की, ‘मग काही वर्षांनतर मला एक कॉल येतो- ‘हाय संतोष सर, रेड चिलीज एंटरटेनमेंटमधून बोलतोय, आपण भेटू शकतो का? आमच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं आहे. शक्य असेल तर ऑफिसमध्ये भेट द्या.’


हा प्रसंग सांगितल्यानंतर अभिनेत्याने २०२० मध्ये घडलेला दुसरा प्रसंग सांगितला आहे. तो म्हणतो की, ‘वर्ष -२०२०. ठिकाण – खार- सांताक्रूझ, रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (शाहरुख खानचे प्रोडक्शन ऑफिस). मी गेटवर पोहोचतो माझ्या गाडीतून. गाडी गेटच्याबाहेर पार्क करण्यासाठी साठी जागा शोधतोय. तेवढ्यात कॉल येतो की, ‘हाय सर, तुम्ही कुठे आहात? आम्ही तुमची वाट बघतोय.’ मी त्यांना सांगतो की, मी आलोय, खाली आहे पार्किंगसाठी जागा शोधतोय. तर तो मला म्हणतो, ‘अरे सर आतमध्ये गाडी पार्क करा, थांबा मी कुणालातरी तुमच्या मदतीसाठी पाठवतो.’ आणि काही मिनटात ऑफिसचं गेट उघडलं जातं आणि सिक्योरिटी गार्ड धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो, ‘सर प्लीझ आईये’

हे वाचा-दोन मंत्र्यांच्या पत्नींचं एकमेकींशी जमतं का? अमृता फडणवीस यांचं दिलखुलास उत्तर

संतोष पुढे लिहितो की, ‘बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स… ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप मरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो, ‘भाई मेरा शेर, जा जिले अपनी जिंदगी.’ शाहरुख खानच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य- कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी. बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा. बाकी मला अजून मोठ्ठं करायला तुम्ही सगळे आहातच. आवडलं तर शाब्बास म्हणा आणि नाही आवडलं तर कान पिळा, पण हानू नका’.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.