मुंबई : बाॅलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा शेवटचा सिनेमा रिलीज झाला होता २०१८मध्ये. त्यामुळे फॅन्सना लवकरात लवकर अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. बाॅलिवूड बादशहाही फॅन्सना निराश करणार नाही. म्हणूनच लागोपाठ शूटिंग सुरू आहेत. एका बाजूला पठाण, दुसरीकडे जवान आणि त्याचबरोबर डंकीही. राजकुमार हिराणीच्या डंकी सिनेमाचं शूट लंडनला सुरू आहे. सेटवरचे फोटो लीक झाले आणि व्हायरलही झाले.

कुणाच्या प्रेमात पडलीये प्राजक्ता माळी? फोटो शेअर करत म्हणाली- ‘तेरा यह इश्क’

या फोटोत शाहरुख आणि तापसी लंडनच्या रस्त्यावर दिसत आहेत. शाहरुख गुडघ्यावर बसला आहे. त्याच्या जवळ तापसी उभी आहे. ती हसत आहे. दोघांच्या हातात मोठ्या बॅग्ज आहेत. असं वाटतंय, दोघं एकत्र प्रवासाला निघाले आहेत.

पहिल्यांदा शाहरुख आणि राजकुमार हिराणी एकत्र
डंकी सिनेमामुळे किंग खान आणि हिराणी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. याच वर्षी सिनेमाचा उल्लेख झाला. त्यावेळी शाहरुखनं एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो राजकुमार हिराणीकडे कामाची याचना करतोय. त्यावेळी संजय दत्तचा मुन्नाभाई, आमिर खानचा पीके अशा सिनेमांचे तो उल्लेखही करतोय.

शाहरुखबरोबर काम करताना बोलली तापसी
तापसी शाहरुखबरोबर काम करताना खूश आहे. ती म्हणाली, ‘जेव्हा तुम्हाला शाहरुखसोबत काम करायची संधी मिळते, तेव्हा ती सोनेरी संधी असते. त्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी असल्यावर तर बघायलाच नको. सोने पे सुहागा. हे खूपच क्लासिक काॅम्बिनेशन आहे.’ डंकी २२ डिसेंबर २०२३ला रिलीज होणार आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी टाकलंय चाहत्यांना कोडं, पाहा तुम्हाला येतंय का उत्तर!

पंजाबमध्ये होईल डंकी सिनेमाचं शूटिंग
डंकी हा सिनेमा देशाच्या सीमेवरून गैरमार्गानं प्रवेश करणाऱ्यांवर आहे. लंडनहून शूटिंग करून शाहरुख खान ऑगस्टमध्ये भारतात परतेल. नंतरचं शूटिंग पंजाबमध्ये होणार असल्याचं कळतं. पंजाबमध्ये शाहरुख खानचं बाइकवरचं एक गाणं शूट होणार आहे.

शाहरुख- कतरिनाचे सिनेमेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.