मुंबई : क्रिकेट आणी बॉलीवूड यांचे फार जुने संबंध आहेत. सध्याचे क्रिकेटपटूही त्याला अपवाद नाहीत. भारताचा संघ चौथ्या सामन्यासाठी राजकोटला जात असताना दिनेश कार्तिकची अशीच भन्नाट शाहरुख खानसारखी एंट्री पाहून चाहते अवाक् झाले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
दिनेश कार्तिकने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक धुरामधूनच एंट्री घेत आहे. भारतीय संघाने जेव्हा विमानातून उड्डाणाकेले तेव्हाचा हा व्हिडिओ असून यामध्ये भारतीय संघाचे इतर खेळाडूही बसले असून सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले की, ‘व्हिवा रूममधून रोल नंबर वन येत आहे.’ चाहते कार्तिकचा हा व्हिडिओ शाहरुख खानसोबत जोडत आहेत. किंग खानने त्याच्या ‘रईस’ चित्रपटात अशीच एन्ट्री केली. कार्तिकने मात्र शाहरुख खानच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

शाहरुखच्या संघाचाच होता कार्तिक कर्णधार…
दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार होता. आयपीएलच्या २०१८ साली झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिनेश कार्तिकला आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळाली होती. दिनेशच्या नेतृत्वाखाली कोलकाताच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे २०२० साली दिनेशकडून कोलकाताचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि इंग्लंडच्या इऑन मॉर्गनला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतर दिनेश कोलकाताच्या संघात यावर्षी दिसला नाही. कारण यावर्षी झालेल्या लिलावात आरसीबीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. आरसीबीच्या संघात दाखल झाल्यावर दिनेशने दमदार कामगिरी केली आणि संघासाठी तो एक चांगला फिनीशर ठरला होता. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरी नंतर दिनेशला त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. पण या मालिकेत दिनेशला अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.