बॉलीवूड किंग शाहरूख खानची (shahrukh khan) मुलगी सुहाना खान (suhana khan) सध्या खूप जास्त चर्चेत आहेत कारण ती देखील आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेवून एका चित्रपटातून पदार्पण करते आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा आणि जोया अख्तरने (zoya akhtar) दिग्दर्शित केलेल्या ‘द आर्चीज’ (The Archies) चित्रपटामधून सुहाना खान आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे. सुहानासाठी हा चित्रपट खूप जास्त महत्त्वाचा ठरणार असून वडिलांचे अभिनयाचे गुण तिच्यात किती उतरले आहेत हे यातून उलगडणार आहे.

या चित्रपटामध्ये सुहाना व्यतिरिक्त अन्य स्टार किड्स सुद्धा आहेत. पण सुहाना आधीपासूनच खूप प्रसिद्ध असल्याने या चित्रपटातील तिच्या कॅरेक्टरची जास्त चर्चा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुहानाच्या एकंदर अपीरियन्समध्ये मोठा फरक पडला आहे. स्टाईल आणि फॅशनची तिला अधिक जाण आली आहे आणि त्यामुळे तिचे गेल्या काही वर्षातले लुक्स देखील हिट ठरले आहेत. तिचा असाच एक खास लुक्स नुकताच समोर आला जिथे ती फिल्म सेटवर अन्य स्टार्स सोबत नजरेस येत आहे. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @suhanakhan2, @khushi05k, योगेन शाह, )

खुशी कपूरसह सुहानाचा लुक

सुहाना खानने आपल्या इंस्टाग्रामवर जेवढे फोटोज शेअर केले आहे त्यात ती खुशी कपूर, अगस्त्या नंदा आणि अन्य को-स्टार्स सोबत दिसून येते आहे. शाहरूखची ही लाडकी लेक ब्लॅक कलरच्या क्रॉप टॉप आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसून येते आहे तर खुशी कपूर लूज फिटिंग स्वेटर आणि जीन्सच्या लुक्स मध्ये पाहणाऱ्याला घायाळ करते आहे. पण हा फोटो पाहताच पहिली नजर खेचून घेते सुहाना खान अर्थातच शाहरूख खानची मुलगी आहे ती, तिच्या चेहऱ्यातही आणि लुक्स मध्येही तो चार्म आहे जो पाहणाऱ्याला लगेच आकर्षित करतो!

(वाचा :- फिकट रंगाची साडी व केसांत सुंदरसं चमेलीचं फुल घालून जया बच्चन पोहचल्या अंबानींच्या घरी, थेट रेखाच्या सुंदरतेला दिली तगडी टक्कर..!)

क्रॉप टॉप आणि ब्ल्यू जीन्स

सुहानाने या लुकमध्ये जो ब्लॅक कलरचा टॉप परिधान केला आहे त्याचे पॅटर्न मायक्रो मिनी होते, यामुळे तिची टोन्ड मिडरीफ हायलाईट होत होती. बिलो द बस्ट वर टॉपमध्ये इलास्टिक होती, जी तिची सडपातळ आणि टोन्ड फिगर मस्त फ्लॉन्ट करत होती. सुहानाचे बॉडी कर्व्हस या लुकमध्ये एवढे छान फ्लॉन्ट होत होते की प्रत्येक नजर तिच्या या फोटोजवर जणू खिळत होती. याची साक्ष देत होते तिला मिळालेले लाईक्स आणि कमेंट्स!

(वाचा :- प्रियांका चोप्राच्या डीप व बॅकलेस गळ्याच्या व्हाईट अँड ब्लॅक ड्रेसवर खिळल्या लाखो नजरा, ट्रोलर्स सुद्धा बोल्ड लुक बघून झाले घायाळ..!)

खुशी कपूरचा लुक

सुहानाने फिटेड टॉपसोबत ब्लू मिड-राइज डेनिम जीन्स कॅरी केली होती. आपल्या या लुकला कंपलिट करण्यासाठी सुहानाने हूप ईयररिंग्स आणि मिनिमल मेकअपची निवड केली होती. आता आपण खुशी कपूरच्या लुकबद्दल जाणून घेऊया. खुशीने बीज रंगाचा अगदी सैल स्वेटर परिधान केला होता. मॅचिंग म्हणून तिने ब्ल्यू डेनिम जीन्स परिधान केली होती. खुशीचा हा लुक अत्यंत कम्फर्टेबल वाटत होता आणि तिची युनिक हेअरस्टाईल देखील चाहत्यांचा नजर आकर्षित करण्यास यशस्वी ठरली.

(वाचा :- धक् धक् गर्ल माधुरी दीक्षितचा वेड लावणारा लुक व्हायरल, डायमंडची साडी अन् स्लिव्हलेस ब्लाउजमधील फोटो पाहून चाहते घायाळ..!)

दिशाचा लुक सुद्धा पडला फिका

एकीकडे सुहानाने ब्लॅक क्रॉप टॉपने आपला लुक कंपलिट केला होता तर दुसरीकडे दिशा पाटणीने आपल्या एयरपोर्ट लुकसाठी अल्ट्रा मिनी क्रॉप टॉप आणि कार्गो पँट्सची निवड केली होती. दिशाचा हा लुक अत्यंत हॉट दिसत होता हे जरी खरे असले तरी तिच्यासमोर सर्वात जास्त भाव 22 वर्षांची सुहाना खानच खाऊन गेली. दिशापेक्षा सुहानाने आपले कर्व्हस फ्लॉन्ट करून ज्या पद्धतीने पोझ दिल्या होत्या त्या पाहता येणाऱ्या काळात ती सुद्धा एक फॅशन आणि स्टाईल सेन्सेशन बनणार यात वाद नाही!

(वाचा :- अरारारारा खतरनाक… अभिनेत्री सामंथाचा बोल्ड लूक, तुम्हीही घेऊ शकता वर्कआऊट क्लोथसाठी खास फॅशन टिप्स)

सुहानाने मिळवणं न्यूनगंडावर विजय

आपल्याकडे आजही सौंदर्याचे प्रतिक म्हणून रंगाकडे पाहिले जाते आणि सुहानासाठी ही गोष्ट खूपच वेदनादायी ठरली. बॉलीवूड किंग शाहरूख खानची मुलगी असल्याने तर तिला मोठ्या न्यूनगंडाला सामोरे जावे लागले. तिची मोठ्या प्रमाणात खिल्लू उडवली गेली. पण तिने शेवटी या न्यूनगंडावर विजय मिळवलाच. तिने मानसिकदृष्ट्या स्वत:मध्ये असा बदल केला आहे की आता जग काय म्हणतं याचा तिला काहीच फरक पडत नाही. उलट ती तर चक्क आता फिल्ममध्ये पदार्पण करते आहे. तिचं बॉलीवूड करियर यशाच्या शिखरावर जावो याच शुभेच्छा!

(वाचा :- सूर्याचं नाजूक किरण जणू , स्लीव्हलेस ड्रेसमध्ये जिनिलिया डिसुझाचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून सोशल मीडिया तापलं !)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.