पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. या निमित्त ते सासवडला सभा घेणार आहेत. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे. त्या सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची राज्यात सध्या निष्ठा यात्रा सुरू आहे. बंड केलेल्या आमदारांच्या जिल्ह्यात आदित्य ठाकरे फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ७ वाजता पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे. बरोबर त्याचवेळेला आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला नागिरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोकण या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ज्या ठिकाणी ठाकरे यांची यात्रा झाली तिथे घेतलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांना गद्दार, बंडखोर बोलून त्यांना डिवचण्या प्रयत्न केला आहे. म्हणून उद्या शिंदे आणि ठाकरे यांचा एकाच जिल्ह्यात दौरा असल्याने आदित्य ठाकरे शिंदे यांच्या विषयी काय बोलतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंना काय उत्तर देतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नड्डांना जाब विचारून स्वाभिमान राखत एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा: सुषमा अंधारे

असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

मंगळवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठक आहे. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी फुरसुंगी येथील पाणी योजना प्रकल्पाला भेट व पाहणी करणार आहे. तसेच २ वाजून २० मिनिटांनी खंडोबा जेजुरी देवस्थान येथे भेट व राखीव आणि त्यानंतर सासवड येथे २ वाजून ४५ मिनिटांनी शिवसेना पक्षाची जाहीर सभा, तसेच ४ वाजता माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या निवस्थानी राखीव. ५ वाजून ४५ मिनिटांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, फुटबॉल मैदान उद्घाटन, संध्याकाळी ७ वाजता आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थान येथे भेट व राखीव. तसेच ८ वाजून ४० मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बैठक तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभागृहात आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रबाबत बैठक असणार आहे.

रातकिडा, बांडगुळं; भाजपवर टीका करताना शिवसेनेच्या नेत्या पाहा काय, काय बोलून गेल्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published.