मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्यामुळे राज्यातील राजकीय तिढा आणखी वाढत चालला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्लीतच असतील. त्यामुळे शासकीय बैठकांच्या निमित्ताने दिल्ली गाठणारे शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराचा खलिता घेऊन परतणार का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचंही लक्ष लागलं आहे.

गेल्या महिन्याभरातील हा शिंदेंचा सहावा दिल्ली दौरा आहे. याशिवाय त्यांनी राजधानीचे गुप्त दौरे केल्याच्याही चर्चा असतात. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न येताच ‘तारीख पे तारीख’ हा एकच डायलॉग ऐकायला मिळतो. त्यातच शिंदे-फडणवीस दोन दिवस दिल्लीतच असल्यामुळे रविवारी होणारा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारही पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा कशासाठी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ११ वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेचार वाजता ही बैठक होईल. यासाठी फडणवीसही दिल्लीला जाणार असले, तरी वेगळ्या विमानाने दिल्ली गाठण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : आज मी राज्याचा उपमु… अजितदादा बोलता-बोलता अडखळले, मग…

याशिवाय, उद्या सकाळी १० वाजता नीती आयोगाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. दोन शासकीय बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणं साहजिक मानलं जातं. त्यानंतर उद्या दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईत परत येतील.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना अजून बरंच काही पाहायचंय; शिवसेनेकडून आतापर्यंतची सर्वात घणाघाती टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी पक्षश्रेष्ठींसोबत त्यांनी कॅबिनेट विस्तारावर चर्चा केल्याची माहिती आहे. नेमक्या कुठल्या कारणावरुन मंत्रिमंडळ विस्तार रखडला, हे स्पष्ट नाही. मात्र वजनदार खात्यांवरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होत आहे का, असा सवाल विचारला जात आहे. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे विस्तार रखडल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा : राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी, शिवसेना आमदार भास्कर जाधवांची जीभ घसरलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.