नवी दिल्ली: ते दिवस गेले जेव्हा फक्त आर्थिक तज्ञच गुंतवणूक करायचे. आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामुळे आता कोणीही सहज गुंतवणूक करू शकतो. नवीन गुंतवणूकदार देखील गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल सहज जाणून घेऊ शकतात आणि गुंतवणूक करून पैशाची बचत करत कमाई करू शकतात. मात्र गुंतवणुकीसाठी कोणताही शॉर्टकट नाही. जर तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल तर काही मूलभूत नियम लक्षात ठेवून बाजार समजून घेऊन गुंतवणूक केल्यास, तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पण गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या.

आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा
कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेतली पाहिजे. ध्येय निश्चित न केल्यास त्याची पूर्तता केली जाऊ शकत नाही. तुमच्या आर्थिक उद्दिष्टे लिस्ट करा आणि मग त्याला तीन वेगवेगळ्या विभागात – अल्पकालीन, मध्यम मुदत आणि दीर्घकालीन – त्याची विभागणी करा. अल्पकालीन उद्दिष्टे ६ महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंत असू शकतात. तुम्ही मध्यम मुदतीसाठी घर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवू शकता, तर दीर्घकालीन मुदतीत मुलांचे शिक्षण आणि सेवानिवृत्ती यासारख्या उद्दिष्टांचा समावेश केला जाऊ शकतो.

पोस्टाच्या ‘या’ योजनांमधून म्युरिटीपूर्वी पैसे काढू नका, भरावा लागेल दंड; गुंतवणूकदारांनो, काळजी घ्या!

५०:३०:२०चा नियम
आता स्वतःसाठी खर्चाच्या श्रेणीत सर्व प्रथम आवश्यक मासिक खर्च निश्चित करा. यानंतर “Want” किंवा इच्छेची श्रेणी ठरवा. “गरज” आणि “इच्छा” मध्ये योग्य समन्वय ठेवले पाहिजे. या समन्वयासाठी तुमच्या बजेटमध्ये ५०:३०:२० चा नियम योग्य ठरेल. या सूत्रानुसार प्रत्येक महिन्याचा पगार वेगवेगळ्या भागात विभागून घ्या.

गरजेसाठी ५० टक्के
तुमच्या पगारातील किमान ५० टक्के गरजांसाठी ठेवा. यामध्ये घरभाडे, गाडीचा ईएमआय, युटिलिटी (उपयुक्तता), किराणा सामान यासारख्या अत्यावश्यक गोष्टींचा समावेश करावा. त्यानंतर तुमच्या इच्छेवर ३० टक्के खर्च करा ज्यात स्ट्रीमिंग सेवा, खरेदी, सुट्टी यासारख्या खर्चाचा समावेश असू शकतो.

गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट योजना! या म्युच्युअल फंडांनी होईल भरघोस कमाई, अल्पावधीत पैसे डबल होतील

आपत्कालीन निधी
तुमच्या मासिक उत्पन्नातील किमान २० टक्क्यांची बचत करा, ज्यातून तुम्ही आपत्कालीन निधी तयार करू शकता. लक्षात ठेवा की आपत्कालीन निधी तुमच्या मासिक खर्चाच्या ६ ते ९ पट असावा, जे पूर्णपणे लिक्विड स्वरूपात असेल. याशिवाय सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण, क्रेडिट कार्ड पेमेंट इत्यादी खर्चही लक्षात घ्या. क्रेडिट कार्डचा योग्य वापर आवश्यक असून जर तुम्ही जास्त खर्च करत असाल तर तुम्ही तो टाळला पाहिजे. यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होईल आणि आवश्यक गुंतवणूक कमी होईल.

छोटी बचत मोठा फायदा! LIC च्या या ५ योजनांवर बचतीसह मिळवा अनेक फायदे, चेक करा डिटेल्स

गुंतवणूकीपूर्वी विमा खरेदी
तुमचे बजेट पूर्ण झाल्यावर त्याचे सतत पुनरावलोकन करत राहा. जास्त खर्च दिसल्यास तिथे कपात करा. शक्य असल्यास खरेदी कार्डचा खर्च व्यवस्थापित करा. याशिवाय नियमित गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी कुटुंबासह तुमच्यासाठी विमा खरेदी करणे आवश्यक आहे. यामध्ये आरोग्य, अपघाती विमा, मुदत विमा, गंभीर आजार विमा यांचा समावेश करावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *