मुंबई : भाभी जी घर पर है कार्यक्रमातील अभिनेता दीपेश भान यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपेश यांचे सहकलाकार तर या धक्क्यातून अजूनही बाहेर आलेले नाहीत. दीपेश यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांनादेखील त्यांचं असं अचानक जाण्यामुळे तीव्र दुःख झालं आहे. भाभी जी घर पर है कार्यक्रमात अंगुरी भाभी ही भूमिका पहिल्यांदा श्वेता शिंदे हिनं साकारली होती.

कसं आहे आमिर खानचं रिना आणि किरणबरोबरचं नातं, उलगडली गुपितं

शिल्पाला जेव्हा दीपेश भान याच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा ती खूपच उदास झाली. खरं हा कार्यक्रम शिल्पानं सहा वर्षांपूर्वीच सोडला होता. परंतु आजही मलखान सिंह उर्फ दिपेश याची आठवण तिच्या मनात आहे. त्याच्या आठवणींमध्ये शिल्पा भावुक झाली. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखीतमध्ये तिनं सांगितलं की, ‘तो माणूस म्हणून खूप चांगला होता. कार्यक्रमाच्या चित्रिकरणावेळी आम्ही सर्व मिळून खूप धम्माल करायचो. मी कार्यक्रम सोडल्यानंतर माझा त्या कलाकारांशी फारसा संपर्क राहिला नाही. मी एकदा दीपेशला फोन केला होता परंतु त्यानं माझा फोन घेतला नाही.’


भाभीजी म्हणून हाक मारायचा दीपेश

याच मुलाखतीमध्ये शिल्पानं सांगितलं की, दीपेश तिला भाभीजी म्हणून हाक मारायचा. तिनं हे देखील सांगितलं की, कार्यक्रमात टीकाची भूमिका करणाऱ्या वैभव मिश्राला दीपेशनं सांगितलं होतं की, त्याला शिल्पाची खूप आठवण यायची. तिचा फोन न घेतल्याचं वाईटही वाटलं होतं.

सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी

फोन न घेण्यामागं हे होतं कारण

शिल्पानं सांगितलं की, कार्यक्रम सोडल्यानंतर त्यातल्या कलाकारांपासून ती लांब गेली. कारण ते सर्वजण तिच्याशी बोलायचे बंद झाले होते. दीपेशनं देखील याच कारणामुळे तिचा फोन घेतला नाही. परंतु जे झालं ते झालं. दीपेश आता या जगात नाही. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.


दरम्यान, दीपेश भान याच्या निधनानंतर त्याच्या जवळच्या मित्रांना मोठा धक्का बसलाय. सध्या या कार्यक्रमात अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे हिला तर त्याच्या प्रार्थना सभेमध्ये रडू आवरणं कठीण झालं होतं. वैभव मिश्रा यानं सांगितलं की, आता कुठे दीपेशच्या आयुष्यात चांगले दिवस येत होते. त्यांनी आतापर्यंत खूप संघर्ष केला होता. त्याला आयुष्य भरभरून जगायचं होतं.

अशोक सराफांसोबतची पहिली भेट विसरूच शकत नाही- रवी जाधव

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.