पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रभर शिवसेनेत जसे दोन गट पडले, तसे पुण्यातही दोन गट पडले आहेत. त्यातील उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या गटाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) करत आहेत. दुसरीकडे शिंदे गटात पुण्यातील अनेक माजी नगरसेवक आणि नेते सामील होत आहेत. ही लढाई आता रस्त्यावर देखील पाहायला मिळत आहे. कारण कात्रजमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेनंतर माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यानंतर हे दोन गट खऱ्या अर्थाने समोरासमोर आलेलं पाहायला मिळत आहे.

आता फक्त रस्त्यावरच नाही तर ही लढाई थेट WhatsApp ग्रुप पर्यंत येऊन पोहोचली आहे. पुण्यात एक शिवसेना-युवासेना पत्रकार मित्र नावाचा ग्रुप आहे. या ग्रुप मध्ये अनेक पत्रकार, शिवसेनेचे बडे नेते हे आपले विचार मांडत असतात. नीलम गोऱ्हे देखील या ग्रुपमध्ये अनेक राजकीय, सामाजिक विषयांवर आपली मतं नेहमी मांडत असत. मात्र या ग्रुपमधून आता थेट नीलम गोऱ्हे यांनाच काढून टाकण्यात आले आले आहे. शिंदे गटाचे नेते आणि युवासेनेचे सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे किरण साळी यांनी नीलम गोऱ्हे यांना या ग्रुप मधून बाहेर काढले आहे.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? राजभवनात लगबग सुरु

वास्तविक पाहता पुण्यातील किरण साळी यांची राजकीय कारकीर्द नीलम गोऱ्हे यांच्या छत्रछायेखाली सुरू झाली. किरण साळी हे नीलम गोऱ्हे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून पुण्यात मिरवत होते. एवढेच नाही तर किरण साळी हे नीलम गोऱ्हे यांचे शिष्यच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र आता किरण साळी हे आता उदय सामंत यांच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी एक झाले आहेत. त्यामुळे पुण्यात उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव टोकाला गेला आहे. त्यातूनच किरण साळी यांनी नीलम गोऱ्हे यांना व्हाट्सअप ग्रुप मधून रिमूव्ह केलं असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत शिंदे गट-ठाकरे गट भिडले, शिवसेना शाखेची अखेर फाळणी

दरम्यान, शिवसेनेची सातत्याने बाजू मांडणारे संजय राऊत यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केल्याने त्यांच्याऐवजी आता खासदार अरविंद सावंत तसेच, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या सभांना गर्दी का? भाजप खासदार सुजय विखेंनी सांगितलं गणितSource link

Leave a Reply

Your email address will not be published.