मुंबई: मूड खराब झाल्यानंतर आपण काय करतो? एखादं मस्त आवडीचं गाणं ऐकतो. आवडत्या ठिकाणी फिरायला जातो. छंद जोपासतो. अभिनेत्री शिवानी सोनारचा मूड खराब होतो तेव्हा ती काय करते माहिती आहे का? तर ती तिच्या आवडत्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारते. आवडते पदार्थ भरपेट खाल्ले की काही क्षणात तिचा मूड फ्रेश होतो. शिवानी सोनारचे हे सिक्रेट तिच्या ज्या मित्रमंडळींना माहित आहे ते नेहमीच तिला खायला घालून तिचा मूड मस्त बनवत असतात. हा किस्सा सांगून तिने तिच्या चाहत्यांना दिलखुश करून टाकले आहे.

हे वाचा-बिग बॉसच्या घरात एकमेकीचं पटलं नाही, आता अभिनेत्री म्हणतेय- ही दोस्ती तुटायची नाय!

‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका शिवानी करत आहे. या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. शिवानीला तिला खायला खूप आवडतं. त्यातही मोमोज हा तिचा आवडता पदार्थ आहे. शिवानीला पोटभरून नाश्ता करायला खूप आवडतं. तिचं म्हणणं आहे की जेव्हा आपण सकाळचा नाष्टा व्यवस्थित आणि पोट भरून करतो तेव्हा त्यातून प्रचंड एनर्जी मिळते.


शिवानी रोज संध्याकाळी सात वाजता न चुकता पेटपूजा करते कारण ती रात्रीचे जेवण करत नाही. शिवानीचा हा खाण्याचा फंडा तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. हे झालं रोजचं. पण काही कारणाने शिवानीचा मूड खराब झाला आणि तिच्यासमोर जर आवडीचा पदार्थ आला तर त्यावर ताव मारून ती सगळा खराब मूड विसरून जाते. राजा राणीची गं जोडी या मालिकेच्या सेटवरील प्रत्येकालाच आता शिवानीच्या मूडची ही किल्ली माहिती झाली आहे.

हे वाचा-आई प्रसिद्ध अभिनेत्री तरीही… या स्टारकिडचं करिअर एका अफेअरमुळे संपल!

शिवानी सांगते की, अभिनेत्री आहे म्हणून अनेकदा खाण्याच्या आवडीनिवडींवर नियंत्रण ठेवावे लागते हे जरी मान्य असलं तरी मला नेमकं तेच जमत नाही. त्यापेक्षा मी खाऊन पिऊन व्यायाम करण्यावर भर देते. खूप खाल्ल्यानंतर त्यांचं वजन पटकन वाढतं अशी माझी प्रवृत्ती आहे. त्यामुळे मला त्याची खूप काळजी घ्यावी लागते की मी जे खाते ते जास्त आहे का कमी यापेक्षा ते पौष्टिक असावं यावर माझा भर असतो.

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे. मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे. रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे. अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे .





Source link

Leave a Reply

Your email address will not be published.