[ad_1]

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात हणमंत विठ्ठल काळे (वय ३८ वर्षे रा. मार्डी उत्तर सोलापूर) यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तीन मुलांना घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न हणमंत काळे यांनी केला. पण आजोबा विठ्ठल काळे यांच्यामुळे तिन्ही मुले वाचली. तर हणमंत काळे याची पत्नी सुनीता काळेला बेशुद्धअवस्थेत तळ्यातून बाहेर काढण्यात आले.
प्रेम विवाहाला विरोध, प्रियकराच्या साथीने पोटच्या मुलीने दिली वडिलांची सुपारी, पण…
मृत हणमंत काळे हे सोलापूर शहरातील एका खासगी शाळेत शिपाई पदावर होते. या घटनेनंतर त्यांचे वडील विठ्ठल काळे यांनी शिक्षण प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुलाला शिक्षण प्रशासनाने शाळेत कायम केले नाही. त्यामुळे नैराश्यातून मुलाने आत्महत्या केली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबालाही आत्महत्या करण्यास लावत होता. सुदैवाने यामध्ये तिन्ही मुले आणि पत्नी सुनीता काळे ही बचावली आहे, असे विठ्ठल काळे यांनी सांगितले.
स्वयंपाक करताना नातवाने आजीला ओढलं, अंगावर डिझेल ओतलं अन्… मन सुन्न करणारी घटना
आजोबांना हाक मारल्याने बचावली मुले

हणमंत काळे हे बुधवारी सकाळी आत्महत्या करण्याच्या बेताने पत्नी सुनीता आणि तिन्ही मुलांना घेऊन शेततळ्याकडे गेले. यामुळे मुले आणि पत्नी हे गोंधळात होते. त्यांना संशय आला होता. काही कळण्याआधीच हणमंत याने पत्नी सुनीताचा हात धरून शेततळ्यात उडी मारली. घाबरलेल्या मुलांनी आजोबा विठ्ठल काळे यांना हाक मारली. विठ्ठल काळे यांनी नातवांचा आवाज ऐकून शेततळ्याकडे धाव घेतली. त्यांनी तिन्ही मुलांना शेततळ्याच्या बाजूला आणून सोडले. आणि आरडाओरडा करत मदत मागितली.

कोथिंबीरचा भाव घसरला, शेतकरी वैतागला; पेंढ्या रस्त्यावर फेकल्या

पत्नीला बेशुद्धा अवस्थेत काढले बाहेर

आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी शेततळ्यात उड्या मारून हणमंत काळे आणि त्यांची पत्नी सुनीता यांचा शोध सुरू केला. यावेळी सुनीता काळे यांना बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर हणमंत काळेला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृताच्या वडिलांनी केले गंभीर आरोप

मृत हणमंत काळे यांचे वडील विठ्ठल काळे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे कुटुंबासह राहतात. हणमंत काळे जवळपास १३ वर्षांपूर्वी सोलापुरातील खासगी शाळेत शिपाई म्हणून भरती झाला होता. शालार्थ आयडी नसल्याने त्याचा एकदाही पगार झाला नाही. शालार्थ आयडीसाठी काही अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्याने अधिकाऱ्यांनी शालर्थ आयडी दिला नाही. त्याच तणावातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृताचे वडील विठ्ठल काळे यांनी केला आहे. पैशाची मागणी कोणी केली त्या अधिकाऱ्याचे नाव मुलाने सांगितलं नाही. पण तो कायम याच तणावात होता, अशी माहिती विठ्ठल काळे यांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *