मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात लोकप्रिय झाली. कोणतंही पात्र असो ते श्रेया अगदी समरसून साकारते. इतकंच नाही तर ती उत्तम नकलाही करते. तिची विनोदाची जाणदेखील उत्तम आहे. श्रेया या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते. तिच्या भूमिकांना प्रेक्षकही दाद देतात.

अभिनयाबरोबरच श्रेयाचे सोशल मीडियावरदेखील मोठ्या संख्येनं चाहते आहेत. श्रेया तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सातत्यानं ती सोशल मीडियावर शेअर करते. ग्लॅमरस फोटोंबरोबरच श्रेया तिच्या भटकंतीचे फोटोदेखील शेअर करते. आतादेखील श्रेया गोव्याच्या ट्रीपवर आहे. तिथले अनेक सुंदर फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विवेक- तन्वीच्या रील्सची हवा! या Video ला मिळाले १६ कोटी व्ह्यूज

समुद्र किनाऱ्यावर निवांत क्षणाचे अतिशय सुंदर फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यालाही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्ट केल्या आहेत. गोव्यातील निसर्गाचे, तिथल्या निवांत क्षणाचे अनेक फोटो श्रेयानं शेअर केले आहेत.


गोव्यातील अप्रतिम सौंदर्याच्या फोटोंबरोबरच श्रेयानं तिथल्या खाद्य यात्रेचे फोटोदेखील शेअर केले आहेत. गोव्यातील अस्सल मासांहारी मेजवानीचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात फिश फ्राय, फिश करी, भात, सोलकढी अशा विविध पदार्थांनी भरलेल्या ताटाचा फोटोही तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भरलेल्या ताटाचा हा फोटो पाहून कोणत्याही खाद्यप्रेमीच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे श्रेयानं हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर खवय्यांनी लाईक्स आणि कॉमेन्ट्सचा पाऊस पडला आहे. त्यामध्ये अनेक कलाकारांनीही कमेन्ट केल्या आहेत.


फोटो पाहून स्वप्निलनं दिली थेट धमकी

श्रेयाने शेअर केलेला फोटो पाहून अभिनेता स्वप्निल जोशी याच्या तोंडालाही पाणी सुटलं. स्वप्निलनं श्रेयाच्या फोटोवर केलेल्या कॉमेंटमध्ये लिहिलं आहे की, ‘तू गोव्यात असेपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे. जेवणाचे हे फोटो आता मी अजून पाहू शकत नाही…’ स्वप्निलनं केलेल्या या कॉमेन्टनंतर श्रेयानं त्याला चिडवण्यासाठी आणखी एक लज्जतदार थाळीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने इन्स्टास्टोरीला शेअर केला आहे. तसंच स्वप्निलला उत्तर देताना तिनं म्हटलं आहे की, ‘नका ना असं करू…’ दरम्यान, स्वप्निल शिवाय सोनाली खरे, अभिज्ञा भावे, सुयश टिळक यांनी देखील मजेशीर अशा कॉमेन्ट केल्या आहेत.

हेमांगी कवीला लोक म्हणालेले- ‘तुझा रंग बघ, एका पोस्टने करिअर संपेल’

अशोक सराफांसोबतची पहिली भेट विसरूच शकत नाही- रवी जाधव

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.