मुंबई : “संजयचा मला अभिमान आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. संजय माझा जुना मित्र आहे, पत्रकार आहे, निर्भीड आहे, त्यांचं एक वाक्य छान आहे. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. लक्षात घ्या तो ही शरण जाऊ शकला असता पण त्याच्याकडे निर्भीड बाणा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक केलं. त्याचवेळी सगळे दिवस सारखे नसतात. दिवस बदलत असतात, त्यामुळे समोरच्यांनी याचा विचार करावा, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आस्थेने त्यांची विचारपूस केली. यावेळी तुम्ही एकटे नाहीत. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना राऊत कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभी आहे, असा संदेश त्यांनी राऊत कुटुंबीयांना दिला. राऊत कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राऊतांच्या ‘झुकेंगे नहीं’ बाण्याचं कौतुक केलं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणावर ठाकरी भाषेत शरसंधान साधलं.

हे दिवस फिरतील तेव्हा तुमचं काय होईल याचा विचार करा, उद्धव ठाकरेंचा भाजपला गर्भित इशारा

संजय माझा जुना मित्र, लढाऊ बाण्याचं कौतुक

“संजय माझा जुना मित्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, तो पत्रकार आहे निर्भीड बोलतो. तोही शरण गेला असता पण गेला नाही. मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, अशी त्याची भूमिका आहे. याचा मला मनोमन अभिमान आहे. दंडेलशाहीविरोधात न झुकता आपण लढू शकतो, याची ठिणगी संजयने टाकली आहे. त्याचा गुन्हा नेमका काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

दिवस बदलत असतात, ते सदासर्वदा सारखे नसतात, ठाकरेंचा भाजपला इशारा

“राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना आलीच. पण आजचं राजकारण बुद्धीचं नाही तर बळाचा वापर करुन केलं जातंय, याचा खेद वाटतो. पण दिवस बदलत असतात. ते सदासर्वदा सारखे नसतात”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. त्याचवेळी देश कुठे चाललाय, याचा विचार देशातल्या जनतेने करायला हवा, असं सांगत हिटलरचं उदाहरण देऊन उद्धव ठाकरे यांनी देशात एकप्रकारे हिटलरशाही सुरु असल्याचं सूचित केलं.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण धक्का देण्याच्या तयारीत? काँग्रेस सोडण्याच्या चर्चांना उधाण
जे पी नड्डांचा समाचार

आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल केलं होतं. तसेच शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असंही नड्डा काल म्हणाले होते. जे पी नड्डा यांच्या याच भाषणाचा उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. शिवसेना संपवून दाखवावी, असं आव्हानच त्यांनी नड्डा यांनी दिलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.