आता दुर्लक्ष करता काम नये – एकनाथ खडसे
“राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो ओव्हरकॉन्फिडन्स होता, किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झालं ते आता दुर्लक्ष करता काम नये, ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र, शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा जरी झाला तरी महाविकास आघाडीचा पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
हेही वाचा –गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज: एकनाथ खडसे
राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव
राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. आज अंबरनाथमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा –राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची नाराजी स्वाभाविकच: जयंत पाटील
तसेच, “आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावं लागतं, तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे”, असं खडसे म्हणाले.
हेही वाचा –भाजपकडून पंकजा मुंडेंना वारंवार हुलकावणी, संतप्त समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला
राष्ट्रवादीत आल्यानंतर आज मला न्याय मिळाला; उमेदवारी अर्जानंतर खडसेंची प्रतिक्रिया