मुंबई :संजय राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यात येत आहे. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती आहे. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला. संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊतांच्या घरातून ११ लाख ५० हजार जप्त
आज सकाळी ईडीनं संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला. संजय राऊत यांच्या घरातून ईडीनं काही कागदपत्रं जप्त केली आहे. राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.

ते ११. लाख रुपये कशाचे हिशोब लागला
संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या ११ लाख ५० हजार रुपयांचा हिशोब लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १० लाख रुपयांच्या रकमेवर १० लाख रुपये हे पक्षाचे आहेत. दीड लाख रुपये हे घराच्या दुरुस्तीसाठीचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १० लाख रुपयांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीनं ११ लाख ५० हजार रुपये चौकशीसाठी नेण्यात आले आहेत.

ईडी मला अटक करणार, मी अटक व्हायला चाललोय, मरेन पण ठाकरेंची साथ सोडणार नाही : राऊत

पत्रा चाळ प्रकरणी ईडीची संजय राऊतांची चौकशी सुरु
संजय राऊत यांच्या घरी ईडी आज सकाळी दाखल झाली. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवत आहेत. संजय राऊत यांच्या घरातून पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहिती देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी दिली आहे.

ना डर, ना सत्तेचा लोभ, आज बाळासाहेबही म्हणाले असतील, शाब्बास संजय : केदार दिघे

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु आहे, असा आरोप केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भारतानं पाकिस्तानला लोळवलं, स्मृती मानधनानं धोनी स्टाईलनं षटकार लगावत मॅच संपवलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.