मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीनं आज सकाळपासून संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. ईडीनं संजय राऊत यांना ताब्यात घेतलं असून त्यांना फोर्ट येथील ईडीच्या कार्यालयात आणलं आहे. दुसरीकडे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तर, संजय राऊत यांच्या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कदाचित अटक करण्यात येईल, असं म्हटलं. उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी जी मुलाखत घेतली होती त्यात देखील याबद्दल चर्चा झाली होती.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आज सुद्धा संजय राऊत यांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज राऊत यांनी रोखठोक लिहिलं आहे त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सर्व लाज लज्जा शरम सोडून हे सर्व चालेलं आहे. दडपशाही, दमनशाही सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुत्व हा शब्द बोलण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ते केलं. अमरनाथ यात्रेला धोका निर्माण झाला त्यावेळी हे कुठं बसले होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं असून त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, बेशरम लोक आहात पेढे वाटा, संजय राऊतांनी शिंदे गटाला फटकारलं

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण

पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. मुंबईतील गोरेगाव येथे ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांचा म्हाड आणि बिल्डर सोबत करार झाला. म्हाडा, गुरु आशिष बांधकाम कंपनी आणि रहिवासी यामध्ये हा करार झाला. एकूण १३ एकर जागेपैकी साडेचार एकर वर मूळ रहिवाशांना घर आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री बांधकाम करेल असं ठरलं होतं. मात्र गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर ही जागा खाजगी बिल्डरला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात ईडी कडून यापूर्वी गुरु आशिष कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

गळ्यात भगवं उपरणं, हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, भगव्यासाठी लढण्याचा निर्धार,Source link

Leave a Reply

Your email address will not be published.