नाशिक: पत्राचाळ पुनर्विकास आणि एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात अटकेत असणाऱ्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आणखी चार दिवस ईडी कोठडीत काढावे लागणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत ईडीच्या केसमध्ये लवकर जामीन मिळत नाही असं सांगितलं.

संजय राऊतांना (Sanjay Raut In ED Custody) न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडीने राऊतांची ईडी कोठडी आठ दिवसांनी वाढवून मागितली होती. त्यावर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा ईडीच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच“.

हेही वाचा-मुख्यमंत्री रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागतात, सतत प्रवास करतात; थोडातरी पॉझ घ्या: छगन भुजबळ

छगन भुजबळ गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरील ईडीची कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार, महापालिकेची प्रभागरचना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पीएमएलए हा कायदा राक्षसी असल्याचे विरोधक म्हणतात. पण, हा कायदा यूपीए सरकारच्या काळात तयार करण्यात आला. काँग्रेसचे सरकार असताना पी.चिदंबरम यांनीच हा कायदा बनवला होता. त्यामुळे भाजपला तरी काय नावं ठेवणार, असे भुजबळ यांनी म्हटले. येत्या ५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे, ती कशी सुटते ते बघू, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- संजय राऊतांची ती ‘डायरी’ अडचणी वाढवणार, कुणाला पैसे दिले याचा कोडवर्डमध्ये उल्लेख, ईडीचा दावा

संजय राऊतांवर शरद पवार गप्प का?

शरद पवार हे संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर गप्प आहेत, या चर्चेत काही तथ्य नाही. असं काही नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत बोलत आहेत. सुप्रिया सुळे देखील याबाबत बोलल्या, असंही छगन भुजबळ म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त

सततच्या दगदगीमुळे एकनाथ शिंदे हे आजारी पडले आहेत. डॉक्टरांनी सध्या त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या शरीराच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा-मोठी बातमी! संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

संजय राऊतांवर कारवाई, एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात प्रतिक्रियाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.