मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं.

संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा पडताच एकनाथ शिंदे गटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, त्या राऊतांच्या घरावर छापा पडल्यानं आम्ही आनंदी आहोत. सर्वसामान्य शिवसैनिकालादेखील आज आनंदा झाला असेल, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी दिली. संजय राऊत अतिशय हुशार नेते आहेत. त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. ते ईडीलादेखील घाबरत नाहीत. त्यांना स्वत:बद्दल इतका आत्मविश्वास असेल, तर मग घाबरायचं कारण नाही, असं शिरसाट म्हणाले.
राऊतांच्या घरावर ईडीचा छापा; बंधू सुनील खिडकीत आले, खाणाखुणा केल्या अन् निघून गेले
शिवसेनेचे नेते आणि जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. आपण उद्धव ठाकरेंना अडचण सांगितली होती, असं खोतकर काल पत्रकार परिषदेत म्हणाले. तुम्ही अडचणीत असाल तर जा, असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचंही खोतकर म्हणाले. खोतकर यांच्यामागे सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. तोच धागा पकडत पत्रकारांनी शिरसाट यांना राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला. राऊत तुमच्या गटात आले तर पवित्र होतील का, असा सवाल शिरसाट यांना विचारण्यात आला. त्यावर खोतकर यांचा विषय वेगळा आहे. काल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, असं शिरसाट म्हणाले.
Sanjay Raut: ईडीने घरावर धाड टाकली, पण संजय राऊतांचा ‘झुकेगा नय’ बाणा कायम; ट्विट करून म्हणाले…
संजय राऊत म्हणजे काही लोकनेते नाहीत. ते केवळ प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे उठाव होईल, शिवसैनिक रस्त्यावर येतील, अशी सुतराम शक्यता नाही. राऊत यांना बाळासाहेबांचं नाव, त्यांची शपथ घेऊ नये. त्यांना तो अधिकार नाही. नोकरी करत नेते होणं सोपं नाही याची जाणीव आता त्यांना होईल, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नादाला लागून संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका आम्ही अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली. मात्र राऊत कायम विरोधी भूमिका मांडायचे. काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ किती योग्य आहे हेच ते सातत्यानं ठाकरेंना सांगायचे. त्याचमुळे पक्षात फूट पडली. ४० आमदार, १२ खासदार बाहेर पडले. राऊत यांनी लढावं. त्यांना कोणी अडवलेलं नाही. त्यांची काही चूक नसेल तर ते या प्रकरणातून बाहेर येतील, असं शिरसाट म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.