मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात अटकेत असणाऱ्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण आज कोर्टाने संजय राऊत यांची ईडी कोठडी आणखी चार दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे आता राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पुढील चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयातच असेल.

ईडीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही लोकांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. त्यासाठी संजय राऊत कोठडीत असणे गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ईडीची ही विनंती मान्य केली. त्यामुळे आता पुढील तपासात आणखी कोणत्या नव्या गोष्टी समोर येणार, हे पाहावे लागेल.

राऊतांकडून कोठडीतील गैरसोयीबद्दल तक्रार

ईडी अधिकाऱ्यांना आज कोर्टात हजर केल्यानंतर संजय राऊत यांनी ईडी कोठडीबाबत तक्रार केली. ‘मला ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही. तिथे मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तीच परिस्थिती आहे. हवा येण्याजोगी एकही खिडकी नाही,’ अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. राऊत यांच्या या तक्रारीनंतर कोर्टाने याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच मोकळी हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्याची तयारीही दर्शवली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.