हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेत जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी आज (शुक्रवारी) बेदम चोप दिला. यानंतर मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. (the headmister molested the student in hingoli)

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी काम करत असलेले प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार याने मागील काही दिवसापासून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यास सुरुवात केली. शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू लागले होते.

क्लिक करा आणि वाचा- करोनासंदर्भात दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने चिंता मिटवली

मात्र, जादा तासिकाच्या नावाखाली अवचार याने विद्यार्थिनींसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. दरम्यान आज हा प्रकार गावकऱ्यांना कळल्यानंतर गावकऱ्यांनी पाळत ठेवली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने एका विद्यार्थिनीला वर्गाच्या बाजूला असलेल्या खोलीत बोलावताच गावकऱ्यांनी वर्गात प्रवेश केला. गावकरी आल्याचे पाहून अवचार गडबडला त्यानंतर गावकऱ्यांनी त्यास बेदम झोडपले.

क्लिक करा आणि वाचा- ‘आम्ही मरण जवळून पाहिलं’, वादळी वाऱ्याच्या तडाख्यातून वाचलेल्या नागरिकांची भावना

त्यानंतर याबाबतची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर,प्रभाकर भोंग यांनी तातडीने गावात जाऊन प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार यास ताब्यात घेतले. त्याला आखाडाबाळापुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- भाजीपाल्याच्या शेतात अंतर्गत पिक म्हणून पिकवला गांजा, किंमत…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.