रायपूर: छत्तीसगडमधील बालोदाबाजार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १३ वर्षीय मुलीवर तीन वेळा सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ७६ वर्षीय वृद्धाने पहिले अल्पवयीन मुलीला १० रुपयांचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्या नराधमाने त्याच्या ४७ वर्षांच्या मित्रालाही बोलावलं आणि मित्रानेही मुलीवर बलात्कार केला. हे वारंवार सुरु राहिले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महिलेने वृद्धाच्या घरातून बाहेर येताना मुलीला पाहिले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले. बलोदा बाजारचे पोलीस अधीक्षक (एसपी) दीपक झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजराम वर्मा (७६) आणि रमेश वर्मा (४७) या दोघांना सामूहिक बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –व्हिडिओ कॉल आला, समोरची व्यक्ती न्यूड, काही कळायच्या आत फोटो काढले, वृद्धाची ३ लाखांना फसवणूक

पोलिसांनी सांगितले की, मुलीला कुंजराम याने १० रुपयांचे आमिष दाखवले आणि त्यानंतर त्याने रमेशला फोन केला. दोघांनी तिच्यावर तीन वेळा बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. कुंजराम हा एकटाच राहत होता आणि प्रत्येक वेळी १० रुपये देण्याचे आश्वासन देऊन तिला घरी बोलवत होता. कुंजराम हा त्याचा मित्र रमेशसोबत मुलीवर बलात्कार करायचा. शनिवारी मुलीच्या शेजारच्या एका महिलेला कुंजरामच्या घरातून ती बाहेर येताना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. महिलेने मुलीच्या आईला हे प्रकरण सांगितलं. नंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा –पत्नीची हत्या, पतीने विष घेतलं, सासू-सासरे आणि दीर फरार, हत्येच्या रहस्याने पोलीसही हैराण

पोलीस ठाण्यात पोहोचताच मुलीने पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींवर सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि स्थानिक न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा –इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना काळजी घ्या; १९ वर्षाच्या तरुणाने पाहा २२ महिलांसोबत काय केलं

भीषण हत्याकांड! पुण्यात भररस्त्यात तरुणावर ३५ वेळा वार, चाकू भोकसून हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published.