श्रीनगरः जम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी बडगाममधील चडूरा येथील तहसील परिसरात घुसून कश्मीर पंडित राहुल भट यांची हत्या केली. राहुल भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठं दुखः कोसळलं आहे. राहुल भट यांच्या कुटुंबीयांनी दोषींनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

राहुलच्या हत्येचा मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. राहुलची ५ वर्षांची मुलगी गुंजनला. आपल्या वडिलांच्या मृत्यूची कल्पनाही नाही. ती अजूनही आपल्या वडिलांची वाट बघतेय. रोज लवकर घरी येणारा तिचा बाबा अजून आला कसा नाही, हा प्रश्न विचारुन तिने आपल्या आजोबांना भंडावून सोडलं आहे. मात्र, तिच्या या प्रश्नाचे उत्तर हा हतबल बाप देऊ शकत नाहीये.

राहुल भट यांची पत्नी मिनाक्षीला पतीच्या निधनाचा जबर धक्का बसला आहे. मिनाक्षीने दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. राहुल रस्त्याने जाताना येणारे-जाणारे त्यांना सलाम करायचे. त्यांच्या हत्येच्या आधी १० मिनिटे आधी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. तेव्हा मी त्यांना ही नोकरी सोडण्यासाठी सांगितलं होतं, असं मिनाक्षी सांगतात.

वाचाः पंतप्रधान मोदी श्रीनगरला का जात नाहीत?; काश्मीरी पंडिताच्या हत्येवर भाजप नेत्याचा सवाल

बडगाममध्ये राजस्व विभागात राहुल भट (३५) क्लर्क पदावर कार्यरत होते. गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. राहुल भट यांच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

वाचाः दोनदा पंतप्रधान झालात आता पुढे काय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

दहशतवाद्यांनी विचारलं राहुल भट कोण आहे?

दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून राहुल भट यांचं नाव विचारुन त्यांना गोळी मारली. तेव्हा तिथे चार लोकं होते. दहशतवाद्यांनी विचारलं राहुल भट कोण आहे. तेव्हा त्यांनी राहुल पुढे आले. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती त्यांचे राहुल यांच्या वडिलांनी दिली.

वाचाः कॉंग्रेसमध्ये एका कुटुंबात एकच तिकीट देण्याचा विचार, अर्थात अपवाद असणार!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.