सांगली : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगर शहराचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करावे, अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे पडळकर यांनी ही मागणी केली आहे.अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मरण राहील,असे मत या पत्राद्वारे पडळकर यांनी व्यक्त केले आहे. ( demand raised to rename ahmednagar district as ahilya devi nagar)

आमदार पडळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदुस्तानाच्या प्रेरणास्थान आहे.जेंव्हा मुघल, निजामशाहीचे हिंदूंवर सांस्कृतिक हल्ले होत होत, मंदिरे लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळी अहिल्यादेवींनी हिंदू सांस्कृतीमध्ये प्राण फुंकले. मंदिरांचा जीर्णोद्धारा केला.अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वास्तुपाठ घालून दिला.

दोनच मंत्री, त्याला सरकार कसं म्हणायचं? विश्वजित कदम यांनी उडवली खिल्ली
आज जे काही या देशातील सांस्कृतिक वैभव टिकून आहे, त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे, परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर, अहिल्यादेवी हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची स्वातंत्र इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे.

शर्यत रंगात आली आणि होडी अचानक नदीत बुडाली, दर्शकांनी अनुभवला अंगावर काटे आणणारा थरार
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” करण्यात यावे, अशी तमाम आहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव असणारा देशातील पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असणार आहे. त्यामुळे आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरांचा निर्णय तातडीने घ्यावा, ही विनंती, अशा आशयाच्या मजकुराचे पत्र पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

‘जे गेले त्यांना श्रद्धांजली’; शिंदे समर्थकांवर शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा हल्लाबोलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.