संजय राऊत काय म्हणाले?
राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीच गेले नव्हते. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसून टाकली जात आहे. शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना व ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकत आहेत. सत्ता मिळवूनही ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना किती किंमत द्यायची? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
लोकसभा २०२४: भाजपचा होणार ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक विजय; जाणून घ्या ५१२ जागांचे संपूर्ण गणित
महाराष्ट्राची ओळख पुसली जातेय
महाराष्ट्र राज्यानं आतापर्यंत सत्याची कास धरली होती. राज्याची देखील तिच ओळख होती. मात्र, आता राजकारण इतक्या खालच्या स्तराला कधीचं गेलं नव्हतं. सत्याची कास धरणारा महाराष्ट्र ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जातोय.
मुख्यमंत्री-अजितदादांमध्ये जुंपली; ‘दौऱ्यावर कधी जायचं ते मी ठरवेन, उगाच नाक खुपसू नका’
उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत भडकले
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु झाल्यानंतर २१ जूनपासून एकनाथ शिंदे गटाकडून किंवा शिंदे गटातील नेत्यांकडून शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात नव्हती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर नेत्यांविरोधात घेण्यात आलेली ठाम भूमिका, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवरील हकालपट्टीची कारवाई यातून दोन्ही नेत्यांचे पुन्हा एकत्र येण्याचे दोर कापले गेले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात भूमिका घेणारे एकनाथ शिंदे गटातील नेते आता थेट उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. एकेकाळी शिवसेनेत राहिलेले रामदास कदम, दीपक केसरकर, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्यासारख्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जातेय. त्यामुळं शिवसेा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फोडूनही ज्यांचे हात रिकामेच राहिले ते शिवसेना आणि ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ अकत असल्याची टीका केली आहे.
ममता बॅनर्जी भाकरी फिरवणार, सर्वात मोठ्या निर्णयाच्या तयारीत, दिल्ली दौऱ्यानंतर बंगालमध्ये नवा डाव