विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील समुद्रकिनाऱ्यावरून एक विवाहित महिला बेपत्ता झाली होती. याप्रकरणात एक ट्विस्ट आला आहे. ती महिला बंगळुरूमध्ये तिच्या प्रियकरासह असल्याची माहिती आहे. सई प्रिया असं त्या महिलेचं नाव आहे. ती सोमवारी संध्याकाळी पती श्रीनिवाससोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आरके बीचवर फिरायला गेली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. पती श्रीनिवासला वाटलं की ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली आणि बुडाली असावी (Wife ran away with lover).

पत्नी बुडाल्याची तक्रार

श्रीनिवास यांनी पत्नी पाण्यात बुडल्याची तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी साई प्रिया समुद्रात पाय धुण्यासाठी गेली होती. पण, परत आलीच नाही. दोन दिवस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खूप प्रयत्न करूनही तिचा काही थांगपत्ता लागला नाही.

हेही वाचा –अशीही लव्ह स्टोरी, प्रेयसीचं दोनदा लग्न मोडलं, पंचायतने थेट निकाल लावला

एक व्हॉईस मेसेज आणि प्रकरणात नवा ट्वि्स्ट

त्यानंतर आला या प्रकरणात ट्वि्स्ट. बुधवारी साई प्रियाच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर तिच्याकडून एक व्हॉइस मेसेज आला, “मी साई प्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि रवीसोबत (प्रियकर) आनंदात आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतो, आम्ही लग्नही केलंय, आमची काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्नही करू नका, मी पळून-पळून थकले आहे, तुम्ही जास्त दबाव टाकलात तर मी स्वत:चं बरंवाईट करेन. मला पोलीस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका, यात त्यांचा काहीही दोष नाही”, अशी माहिती शहरातील थ्री टाऊन पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामा राव यांनी सांगितले.

हेही वाचा –महिलेशी विवाहबाह्य संबंध, नर्मदेत उडी घेण्यापूर्वी प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

साई प्रियाला शोधण्यासाठी तब्बल १ कोटीचा खर्च

तिच्या मोबाईल कॉल डेटावरून ती तिच्या प्रियकरासोबत बंगळुरूमध्ये असल्याची शक्यता आहे. श्रीनिवास आणि प्रिया यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, प्रिया संगणक कोचिंगच्या नावाखाली विशाखापट्टणम येथे राहत होती. दोघेही एकमेकांसोबत खुश नव्हते, कारण साई प्रियाचं रवीवर प्रेम होतं. मात्र, या शोध मोहिमेत प्रशासनाने सुमारे एक कोटी रुपये खर्च केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –तीन सख्ख्या बहिणींचा एकत्र गळफास, मध्यरात्री मुली अंधरुणात नाही म्हणून आईने…

मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना स्टंटबाजी महागात, कार थेट वाळूतच रुतून बसलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.