मुंबई : कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचा नुकताच रिलीज झालेल्या विक्रांत रोणा सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. अभिनयानंतर किच्चा सुदीप आता दिग्दर्शनही करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात तो बाॅलिवूड सुपरस्टार सलमान खानला घेणार आहे. पण फॅन्सना अजून थोडी वाट पहावी लागणार असल्याचं तो म्हणाला.

सुदीप-सलमानचं चांगलं बाँडिंग
सलमान खानसोबत सुदीपनं दबंग ३ सिनेमात काम केलं आहे. त्याच्या विक्रांत रोणा सिनेमाच्या हिंदी वर्जनलाही सलमान खानंच प्रेंझेंट केलंय.ऑफ स्क्रीन सलमान आणि सुदीपची मैत्री चांगली आहे.याआधीही सुदीपनं सलमानला घेऊन सिनेमा दिग्दर्शित करायची इच्छा व्यक्त केली होतीच. आता किच्चा सुदीपनं एका मुलाखतीत, हे नक्की केलं. फक्त थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असंही म्हणाला.

‘मला काही झाल्यास नाना पाटेकर आणि त्याचे माफिया मित्र जबाबदार’

योग्य वेळी तयार होईल सिनेमा
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत Kichcha Sudeepa म्हणाला,’गेल्या वर्षी या सिनेमाची प्रोसेस सुरू झाली. आता मला सलमानला कथा ऐकवायची आहे. नंतर सलमानचा होकार यायला हवा. मग शूटिंगला सुरुवात होईल. पण सलमान भाई बिझी आहे. अनेकांना त्याच्या बरोबर सिनेमा करायचा आहे. आमची चर्चा सुरू आहे. योग्य वेळी सिनेमा होईल.’

सलमाननं १८ मिनिटं पाहिला सिनेमा
याच मुलाखतीत सुदीप म्हणाला विक्रांत रोणासाठी भाईजानची मदत झाली. सलमानला हा सिनेमा हिंदीत प्रेझेंट करायची ऑफर मिळाली, तशी त्यानं ती लगेच स्वीकारली. सुदीप म्हणाला, सलमाननं फक्त १८ मिनिटं सिनेमा पाहिला आणि डील फायनल केलं.

Video:अभी घर सोडून गेल्यानंतर अरुंधतीच्या मनात अपराधी भाव, संजनानं व्यक्त केली दुसरीच शंका

किच्चा सुदीप याचं खरं नाव आहे सुदीप संजीव. तो सुदीप या नावानं देखील लोकप्रिय आहे. किच्चा सुदीप कन्नड सिनेमांमधील सुपरस्टार आहे. तो कन्नड मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक देखील आहे. ४८ वर्षांचा किच्चा सुदीप यानं कन्नड शिवाय तमिळ, तेलगु आणि हिंदी भाषांतील सिनेमातही काम केलं आहे. किच्चानं बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये सलमान खानच्या दबंग ३, फूंक, रन, फूंक २, रक्तचरित्र १ आणि रक्तचरित्र २ या सिनेमांचा समावेश आहे.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.