मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) धमकीच्या प्रकरणात एका शूटरला हत्येसाठी करारबद्ध केल्याचे समोर आले आहे. एबीपी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संपत नेहरा असे या शूटरचे नाव सांगितले जात आहे. हत्येसाठी ४ लाख रुपयांची रायफलही खरेदी करण्यात आली होती. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकावण्यात बिष्णोई टोळीचाच हात आहे. राजस्थानमधील जालोर येथून तीन जण मुंबईत आले होते. ज्यांनी सलमान आणि त्याचे वडील सलीम यांच्यासाठी घराजवळ धमकीचे पत्र सोडले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीनजणांची ओळख पटवली आहे. वांद्रे येथील सलमानच्या घराजवळ हे पत्र कोणी टाकले.

महाकालच्या खुलाश्यांनी सलमान खानच्या केसला आलं नवं वळण

याप्रकरणी सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली असता पोलिसांना ही माहिती मिळाली. महाकाल हा देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालने सांगितले की, बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड विक्रम ब्रार याचे या संपूर्ण प्रकरणात हात असल्याचं हा धमकीचे पत्र घेऊन सलीम खानच्या घरी गेला होता.


लॉरेन्स बिश्नोई यानेच पाठवलेलं पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पाठवले होते. हे पत्र देण्यासाठी त्याच्या टोळीतील ३ जण जालोरहून मुंबईला गेले होते. पुढे हे तिघे महाकालला भेटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. हे पत्र कोणी दिले त्याला लवकरच अटक करण्यात येईल. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांची सहा पथकं देशातील विविध शहरांमध्ये रवाना करण्यात आली.

सलमान खान धमकी प्रकरण: सौरभ महाकालची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी

दिल्ली पोलिसही पुण्यात पोहोचले

यादरम्यान बुधवारी दिल्ली पोलिसांचे पथक महाराष्ट्रातील पुणे शहरात पोहोचले आहे. पंजाबी रॅपर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला च्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीसही महाकालची चौकशी करणार आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे. याप्रकरणी सिद्धेश हिरामण कांबळे याला अटक करण्यात आली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.