मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलीस सखोल तपास करत आहेत. अलिकडेच महाराष्ट्र पोलिसांनी आणि दिल्ली पोलिसांनी गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याचा खास साथीदार सिद्धेश हिरामल कांबळे अर्थात सौरभ महाकाल (Saurabh Mahkal) याला अटक केली.

महाकाल याला अटक झाल्यामुळे पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाबरोबरच सलमान खान ला मिळालेल्या धमकी प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येणार आहे. महाकालची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं पथक पुण्याला पोहोचलं आहे.

डाॅ.अमोल कोल्हेंनी शेअर केला हृदयस्पर्शी Video, चिमुकलीचा छत्रपतींना अनोखा मानाचा मुजरा

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्दू मूसेवाला याच्या हत्या प्रकरणाचा लॉरेंस बिश्नोई हाच मास्टर माईंड होता. महाकाल हा या बिश्नोईचा खास साथीदार आहे. त्यामुळे महाकाल याला बिश्नोईच्या सर्व गोष्टींची पुरेपुर माहिती आहे. अलिकडेच लॉरेन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. त्यात तो अभिनेता सलमान खान याला जोधपूरमध्ये जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर काही दिवसांनी सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले. त्यात सलीम खान आणि सलमानची हालत सिद्धू मूसेवाल सारखी केली जाईल, अशी धमकी दिली होती.


सलमानला धमकीचे पत्र पाठवले नसल्याचा बिश्नोईचा दावा

दरम्यान, मुंबई पोलिसांची टीमनं तिहार कारागृहात असलेल्या लॉरेंन्स बिश्नोईची चौकशी केली. त्यात बिश्नोईनं सांगितलं की, सलमानला त्यानं कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. तसंच त्याला धमकीचे पत्रही पाठवलेलं नाही. वास्तविक गेल्याच वर्षी पोलिसांनी बिश्नोईची चौकशी केली त्यामध्ये त्यानं सलमानला चित्रीकरणावेळी ठार मारण्यासाठी शूटर संपत याला सुपारी दिल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर यासाठी त्याला चार लाख रुपयांची रायफल देखील विकत घेऊन दिली होती.

सोनमला मुलगा होणार? अनिल कपूर यांच्या पोस्टमुळं चर्चेला उधाण

मुंबई क्राईम ब्रँच आणि दिल्ली पोलिस या प्रकरणी प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं तपास करत आहेत. सलमानला मिळालेल्या धमकी पत्राप्रकरणी सौरभ महाकालची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं एक पथक पुण्यात दाखल झालं आहे. पुणे पोलिसांनी सौरभला बुधवारी अटक केली होती. सलीम खान यांना धमकीचं पत्र कुणी दिलं, त्याच्याशी सौरभ महाकालचा काही संबंध आहे का,याचा तपास पोलिस आता करत आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.