सांगली : सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींनी चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केलं आहे. गेडाम या पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असता हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षलता गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी गेडाम यांच्या हाताला पडकलं. त्यानंतर अज्ञात इसमाला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीवेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ जखम झाली आहे. हल्ला होताच मार्शल आर्टमध्ये पारंगत असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.

Rajyasabha Election 2022: नवाब मलिकांच्या वकिलांची कोर्टात धावाधाव, पण कायदेशीर पेच संपेनात; मतदानाची संधी हुकणार?

दरम्यान, या दोन आरोपींपैकी एकाने १७ मे रोजी हर्षलता गेडाम यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.

धमकी पत्रानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर; विश्वास नांगरे पाटील सलमानच्या घरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.