रत्नागिरी : सुट्टीत वडिलांकडे आलेल्या आर्या या अवघ्या सात वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पण सातारा फलटण येथील नातेवाईकांनी संशय व्यक्त करत हा प्रकार हत्येचा असल्याचा आरोप केला आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली आहे. मृत मुलीच्या आई-वडिलांमध्ये काही वाद असल्याने ते वेगळे रहातात. आई सातारा फलटण येथे तर वडील लांजा कोर्ले येथे असतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावातील ७ वर्षीय मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आर्या राजेश चव्हाण असं या मुलीचं नावं आहे. लहान बहिणीने फास घेतल्याचे सर्वप्रथम मोठ्या बहिणीने पाहिले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी मोठी बहीण शेजारी गेली होती. ती आल्यावर तीला हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.

आर्याच्या आपल्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. आर्याच्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीपासूनची आर्या ही सर्वात लहान मुलगी आहे. आर्याचा घातपात की आत्महत्या असा संशय आता व्यक्त केला जातोय. आर्याची आई सातारा फलटण येथील आहे. सातारा फलटण येथील नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केलाय. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब गुटुकडे करीत आहेत. शवविच्छेदन करता आर्याचा मृतदेह रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. लांजा पोलिस अधिक तपास करत आहेत.

धक्कादायक! पर्यटक असल्याची बतावणी करत रिक्षा चालकांना गुंगीचे औषध दिले, पुढे घडले ते…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.