मंगळवारी अपहरण, बुधवारी मृतदेह सापडला, आईचा टाहो
ही मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. पोलीसही आपल्या पूर्ण शक्तीने तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास त्या चिमुकलीचा मृतदेह गावातल्या शाळेमागे विचित्र अवस्थेत आढळला. लेकीचा मृत्यू झाल्याचं कळताच आईने एकच टाहो फोडला.
हेही वाचा –तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, ३५ लाख द्या! मित्रांनीच केलं अपहरण, शेवट भयानक झाला
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता
या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती स्थानिक लोक प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे. तर तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. संबंधित मुलीचा शवविच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतरच या हत्येमागील नेमकं कारण पुढे येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा –संतापजनक! ७६ वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर तीनवेळा बलात्कार, मित्रालाही फोन करुन बोलवायचा
आरोपीकडून हत्येची कबुली, कारण अद्याप अस्पष्ट
या प्रकरणात पोलिसांनी दादया दळवी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याने ही हत्या का केली याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासाच्या आत तपास लावल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुकही केलं जात आहे.
हेही वाचा –मुलगा शाळेतून घरी आला, बापाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं, तब्बल ३८ वेळा वार, आरोपी घरातलाच…
भीषण हत्याकांड! पुण्यात भररस्त्यात तरुणावर ३५ वेळा वार, चाकू भोकसून हत्या