Dark Circles Treatment : डार्क सर्कस ही एक समस्या बनली आहे ज्याचा सामना जगभरातील लाखो लोक करतात. ते लपवण्यासाठी स्त्रिया फॅन्सी मेकअप आणि अनेक क्रिम्स लावतात. पण खूप पैसे खर्च करुन देखील हवा तसा परिणाम मिळत नाही. महिलांप्रमाणेच पुरुष देखील चेहऱ्यावर अनेक क्रिम लावतात. पण बदलेल्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो.

डोळ्याखालील त्वचा फारच नाजूक असते. त्यामुळेच या भागाची काळजी घेणं गरजेचं असतं यासाठीच डॉ जयश्री शरद यांनी काही उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

​यामुळे निर्माण होतात डार्क सर्कल

डोळ्यांना वारंवार चोळल्याने काळी वर्तुळे निर्माण होतात, जी चोळण्यामुळे उद्भवणाऱ्या पोस्ट-इंफ्लॅमेटरी हायपरपिग्मेंटेशनमुळे होतात. धुम्रपान किंवा मध्यापान केल्याने देखील काळी वर्तुळे वाढते. त्यामुळे जर तुम्हाला या सवयी असतील तर त्या आताच सोडायला सांगा.

(वाचा :- Kiara Advani : कियाराचे ‘ब्युटी सिक्रेट’ स्वयंपाकघरात ! पार्लर नको घरातच करा हा रामबाण उपाय)

​यामुळे तुमची डार्क सर्कल वाढत आहेत

डॉक्टरांनी काळी वर्तुळे वाढवण्याची काही अजून कारणे सांगितली आहेत.

 1. डोळ्यांखाली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन न लावल्यानेही काळी वर्तुळे येतात .
 2. अपुरी झोप
 3. ताण
 4. हिमोग्लोबिन कमी होणे
 5. इन्सुलिन प्रतिकार
 6. कॉस्मेटिक ऍलर्जी
 7. डोळ्यांची ऍलर्जी
 8. प्रदूषण
 9. सूर्यप्रकाशासाठी खूप जास्त एक्सपोजर

(वाचा :- या ५ सोप्या पद्धतीने कमी करा तुमच्या त्वचेवरील टॅन आणि मिळवा काचेसारखी नितळ त्वचा)

डॉक्टरांनी सांगितले डार्क सर्कलवरील उपाय

​अशी दूर करता येतील डार्क सर्कल

दुसर्‍या पोस्टमध्ये डॉ. जयश्री शरद यांनी डार्क सर्कलच्या उपचारांबद्दल माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी काळी वर्तुळे कशी दूर करता येतील हे सांगितले.

 1. डार्क सर्कल कमी करण्यासाठी सतत डोळे चोळणे टाळा.
 2. हिमोग्लोबिन कमी असल्यास देखील डार्क सर्कल तयार होतात.
 3. 6 महिन्यांपेक्षा जुने सौंदर्यप्रसाधने वापरू नका.

(वाचा :- धकधक् गर्ल Madhuri Dixit च्या सौंदर्याचे भारत ते अमेरिका सारेच दिवाने, घायाळ करणा-या सौंदर्यामागील टॉप सीक्रेट उघड..!)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.