मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गोखले कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत. पण त्यासोबतच त्या सिंगल मदर म्हणून एक वेगळाच आदर्श पालकांसमोर ठेवतात. शुभांगी गोखले यांचे पती अभिनेते मोहन गोखले. मोहन गोखले यांच्या निधनानंतर त्यांनी मुलगी सखी गोखले हिला एकटीने वाढवलं. शुभांगी गोखले आणि सखी गोखले या दोघांनी जगासमोर आई आणि मुलीचा एक उत्तम आदर्श ठेवला आहे.

फ्रेंडशिप डेच्या मदतीने आपण सिंगल मदर शुभांगी गोखले आणि मुलगी सखी गोखले यांच्यातील नातं उलघडणार आहे. एक आई आणि मुलगी उत्तम मैत्रिणी होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आदर्श जगासमोर ठेवतात. सखी गोखलेचा जन्म १९९३ सालचा. मोहन गोखले यांचं निधन १९९९ साली झालं. त्यावेळी सखी अवघ्या ६ वर्षांची होती. त्यानंतर तिला शुभांगी गोखले यांनी एकटीने मोठं केलं आहे. शुभांगी गोखले आपल्यासमोर पालकत्वाची दुसरी बाजू उलघडतात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​एकमेकींसाठी असते मोठा आधार

मोहन गोखले यांच्या निधनाच्यावेळी सखी अवघ्या ६ वर्षांची होती. त्यानंतर शुभांगी गोखले यांनी सखीला उत्तम संस्कारात वाढवलं आहे. शुभांगी गोखले आणि सखी गोखले यांचा एकमेकींना मोठा आधार आहे. सखी गोखले हिचं लग्न झालं असलं तरीही ती आपल्या आईची विशेष काळजी घेते. शुभांगी गोखले या सखीसाठी कायमच खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी सखीला आई आणि वडिल असं दोघांच प्रेम दिलं.

(ब्रेस्टफिडिंग करताना माता करतात या चुका; यामुळे बाळांना मिळत नाही संपूर्ण दूध तर आईला होतो छातीत त्रास)

​मैत्रिणी म्हणून ठेवतात खास आदर्श

सखी आणि शुभांगी गोखेल यांच नातं आई आणि लेकीचं असलं तरीही या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. एकमेकींची काळजी घेणे, एकमेकींच्या आवडीनिवडी जपण हा त्यांचा छंदच जणू. एकमेकींना छान गिफ्ट करून आनंद देत असतात. मैत्री ही फक्त आपल्या वयातील व्यक्तीसोबतच होऊ शकते. हा समज या दोघी खोडून काढतात.

(वाचा – Indian Baby Girl Names : ही नावं ठेवाल; तर खूप मोठा विचार करेल तुमची मुलगी, लेकीची अतिशय क्यूट नावं)

​एकमेकींच कायम करतात कौतुक

सखीचं लग्न झालं आहे. सखीने अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्न केलंय. शुभांगी गोखले या कायमच सखी आणि सुव्रत यांचं कौतुक करत असतात. एकमेकींच्या आवडी निवडी आणि खास गोष्टींचं कायमच कौतुक करत असतात. एकमेकींचा स्वयंपाक आणि त्याच्या रेसिपी अनेकदा शुभांगी गोखले आणि सखी गोखले आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात.

(वाचा – Mom Tips : ‘या’ सुंदर अभिनेत्रीकडून सिंगल पॅरेंटिंगच्या टिप्स, करिअर आणि मुलामध्ये असा साधते समतोल))

​सिंगल मदर मुलीला देते उत्तम संस्कार

शुभांगी गोखले यांनी सखी गोखलेवर उत्तम संस्कार केले आहेत. सिंगल मदर म्हणून आईवर खूप जबाबदारी असते. शुभांगी गोखले यांनी ही जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. सिंगल मदर म्हणून त्या कायमच त्या आईवर जबाबदारी असते. शुभांगी गोखले यांनी सखीला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. यामध्ये एक उत्तम व्यक्ती म्हणून कसं वागायचं? कलाकार म्हणून त्यांनी सखीला समृद्ध केलं आहे.

(वाचा – C-Section डिलिवरीपासून वाचण्यासाठी फॉलो करो ७ हेल्दी टिप्स; नॉर्मल डिलिवरीची शक्यता वाढेल))

​एकमेकींच्या आवडीनिवडी जपतात

शुभांगी आणि सखी गोखले एकमेकींच्या आवडीनिवडी जपतात. सोशल मीडियावर त्या अनेकदा या पोस्ट करतात. यामध्ये त्या एकमेकींना साड्या गिफ्ट करणे किंवा खास गोष्टीच्या एकमेकांना भेटी देतात. यामधून शुभांगी गोखले आणि सखी गोखले मैत्रीचं नातं जपतात. या दोघी इतर पालकांसमोर हा आदर्श ठेवतात.

(वाचा – मुलांच्या ‘या’ सवयीमुळे पालकांची वाढते डोकेदुखी; 4 ट्रिक्स करतील पालकांना मदत)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.