मुंबई : ज्या पद्धतीनं विक्की कौशल-कतरिना कैफ आणि रणबीर-आलिया यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक जोड्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. असंच भरभरून प्रेम कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडीवर प्रेक्षकांनी केलं आहे. या दोघांची जोडी केवळ ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीनवरही लोकांना आवडली.ते देखील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडत असल्यानं त्याचं लग्न कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आई तनुजाला घाबरते काजोल, खोटं वाटत असेल तर पाहा हा भन्नाट किस्सा

मात्र जेव्हा या दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली तेव्हा चाहते खूप निराश झाले. काही दिवसांनी पुन्हा हे दोघं एकत्र दिसल्यानं चाहत्यांच्या मावळलेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. कारण या दोघांमध्ये पुन्हा पॅचअप झाल्यानं चाहते आनंदित झाले आहेत. कियारा आणि सिद्धार्थमध्ये आता सारं काही आलबेल झालं आहे. लवकरच हे दोघंजण त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून एकत्रितपणं सुट्ट्यांवर जाणार आहेत, असं कळतं आहे. या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यामध्ये आणि त्यांचं पॅचअप घडवून आणण्यात एका व्यक्तीनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.


या व्यक्तीनं केली मध्यस्थी

एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार कियारा (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचं ब्रेकअप होऊ नये यासाठी करण जोहर ने (Karan Johar) मध्यस्थी घेतली होती. कारण जेव्हा या दोघांच्या ब्रेकअपची बातमी करणला समजली तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. त्यानं या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचं ठरवलं. सिद्धार्थ आणि कियारादेखील एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यामुळेच त्यांनीदेखील या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचं ठरवलं.

‘रानबाजार’साठी गुटखा खाण्याचा असा केला सराव, प्राजक्ताचा VIDEO व्हायरल

लव्हबर्ड लवकरच जाणार सुट्ट्यांवर

एका न्यूज पोर्टलंनं दिलेल्या बातमीनुसार कियारा आणि सिद्धार्थ याचं नातं आता अधिकच दृढ झालं आहे. त्यामुळे ते लवकरच त्यांच्या कामातून ब्रेक घेत सुट्ट्यांवर जाणार आहेत. दोघंजण करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत होते. दोघांनी डान्स फ्लोअरवर एकत्रतच डान्स केला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


दोघांनीही त्यांचं नातं जाहीर केलेलं नाही

कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. मात्र, त्यांनी अजूनही आपलं नातं जाहीरपणे मान्य केलेलं नाही. परंतु सोशल मीडियावर ते दोघंही एकमेकांबरोबर फोटो नेहमीच शेअर करत असतात. आलिया-रणबीर, विकी-कतरिना यांच्याप्रमाणं यांनीदेखील लवकरच लग्न करावं अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

या रॅपिड फायर प्रश्नांमधून पाहा सई ताम्हणकरचं ‘फूड प्रेम’

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.