निशांकनं केलेल्या गुंतवणुकीत त्याला बराच तोटा सहन करावा लागला. त्याची भरपाई करण्यासाठी आणि शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्यासाठी निशांकनं काही मित्रांकडून उधारी घेतली होती. निशांकनं मित्रांचे पैसे परत केले नव्हते. त्यामुळे त्याचा मित्रांशी संवादही होत नव्हता, अशी माहिती सुत्रांनी दिली. निशांकला शेअर बाजार आणि क्रिप्टोमध्ये बराच रस होता. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टवरूनही ही गोष्ट दिसून येते. १६ जून २०२२ रोजी त्यानं क्रिप्टो करन्सीबद्दलची एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती.
याआधी निशांकच्या मृत्यूचा संबंध एका व्हॉट्स ऍपशी जोडण्यात आला. हा मेसेजदेखील निशांकच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ‘गुस्ताब-ए-नबी की एक ही सजा, सिर तन जे जुदा,’ असा मजकूर मेसेजमध्ये होता. आपल्याला व्हॉट्स ऍपवर एक मेसेज आला होता, अशी माहिती निशांकचे वडील उमाशंकर यांनी दिली. ‘राठौर साहेब, तुमचा मुलगा खूप शूर होता. सगळ्या हिंदूंना सांगा, नबीबद्दलच्या चुकीला माफी नाही,’ असा मजकूर मेसेजमध्ये होता, अशी माहिती उमाशंकर यांनी सांगितली होती.