मुंबई- बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी काही कमी नाही. हिंदी सिनेमाकडे मागे वळून पाहिलं तर दाक्षिणात्य नायिकांनी बॉलिवूड गाजवल्याचच दिसतं. तर दाक्षिणात्य नायकही बॉलिवूडमध्ये रमले. गेल्या काही वर्षात बॉलिवूडच्या कलाकारांनाही दाक्षिणात्या सिनेमा इंडस्ट्री खास भूमिका बहाल करताना दिसत आहे. पण आता कन्नड अभिनेत्री मेघा शेट्टीने टॉलिवूडची सीमा ओलांडून मराठी सिनेमात पाऊल टाकलं आहे. कन्नड सिनेमा, मालिका या क्षेत्रातील लोकप्रिय नाव असलेली मेघा शेट्टी लवकरच मराठी सिनेमात नायिकेच्या रूपात पहायला मिळणार आहे. यानिमित्ताने टॉलिवूड आणि मराठी सिनेमा यांचं नवं पर्व सुरू होतंय.

लातूरच्या देशमुख कुटुंबात कशी रमली मुंबईची जिनिलिया डिसूजा

मराठी निर्माते दीपक राणे यांनी आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमाची घोषणा केली तेव्हा कलाकारांचीही चर्चा होती. पण तोपर्यंत मुख्य कलाकारांची नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. या सिनेमाचं एक पोस्टर नुकतच प्रदर्शित झालं असून दाक्षिणात्य पारंपरिक रूपातील मेघा शेट्टी लक्ष वेधून घेत आहे. कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कविश शेट्टी नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर देवयानी फेम शिवानी सुर्वे आणि अभिनेता विराट मडके हे कलाकारही या सिनेमाचा भाग आहेत.


या सिनेमाचं पहिलं पोस्टरही खूप गाजलं होतं. कविश शेट्टीचा अॅक्शन हिरो लुक या पोस्टरमधून समोर आला होता. आता दुसऱ्या पोस्टरमधून मेघा शेट्टीचा लुकही चाहत्यांना भुरळ घालत आहे. दाक्षिणात्या मुलींच्या पारंपरिक वेशभूषेतील साधीसरळ मुलगी अशी तिची भूमिका असेल असं या पोस्टरवरून वाटतय. मेघाच्या चाहत्यांना तिच्या या मराठी भाषेतील भूमिकेची खूपच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे मेघाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिचं पोस्टर रिलीज केलं आहे.

जिनिलिया डिसूजाच्या नावाची आहे अजब कहाणी, कोट्यवधींची आहे मालकीण


दीपक राणे यांनी या सिनेमाची मराठीत निर्मिती करण्याचे ठरवले तेव्हाच मेघाची निवड करण्यात आली. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा पडदयावर येणार आहे. सदागरा राघवेंद्र यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. कन्नड भाषेतील मेघाच्या अभिनयाचे खूप चाहते आहेत, आता तिचा मराठी अंदाज कसा असेल हे पाहण्यासाठी पुढील वर्षीच्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची वाट पहावी लागणार आहे.

‘संजय माझ्याकडे नटरंगसाठी आलेला पण…

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.